• Mon. Apr 28th, 2025

युवा नेते अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन. 

Byjantaadmin

Mar 6, 2025

युवा नेते अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन. 

निलंगा:-भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांचा 9 मार्च रोजी वाढदिवस असल्याने वाढदिवसाच्या औचित्य साधून गेल्या दहा वर्षापासून निलंगा ,देवणी, शिरूर अनंतपाळ तालुक्यात भाजप युवा मोर्चाच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते त्याचाच भाग म्हणून आज निलंगा तालुक्यातील मौजे अनसरवाडा येथे नयन माने ( संकल्प फाउंडेशन) ‌ च्या नियोजनाखाली ‌भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी युवा मोर्चा पदाधिकारी व स्पर्धेचे संयोजक नयन माने, युवा मोर्चा शहराध्यक्ष तम्मा माडीबोने, जामगा सरपंच मनोज पवार, दापका ग्रामपंचायत सदस्य जाधव अजित, किसान मोर्चाचे प्रकाश पाटील,गजानन देशमुख मोहन माने,अभिजीत साळुंखे मारुती शिंदे अमोल झरे शेखर पाटील पंढरी माने विकास बडगिरे लखन धुमाळ व क्रिकेट पाहण्यासाठी पंचक्रोशीतील अनेक क्रिकेट प्रेमी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास 51 हजार रुपये चे पारितोषिक व मानचिन्ह द्वितीय येणाऱ्या संघास 31, हजाराचे व तृतीय येणाऱ्या संघास 21 हजाराचे पारितोषिक देण्यात येणार आहे त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये क्रिकेट विषयी आवड निर्माण व्हावी यासाठी इतर अनुक्रमे चार पाच सहा सात क्रमांकावर असलेल्या संघास देखील उत्तेजनार्थ 11000 चे पारितोषिक व मानचिन्ह देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed