लक्ष्मी अर्बन बँकेस बँको ब्लू रिबीन पुरस्कार २०२४ प्रदान
लातूर *सहकार व बँकिंग या वित्तिय क्षेत्रात उत्तमपणे दर्जेदार सेवा देणाऱ्या सहकारी बँकेस देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील मानाचा अविज पब्लिकेशन्स कोल्हापूर व गॅलक्सी ईनमा पुणे यांच्याकडून *बँको ब्लू रिबीन पुरस्कार २०२४* हा नागरी बँक गटातील प्रथम पुरस्कार लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि, लातूर बँकेस दिनांक २८.०१.२०२५ रोजी अॕंबे वॅली सिटी, लोणावळा येथे भारतीय रिझर्व बँकेचे माजी मुख्य सरव्यवस्थापक (सीजीएम) मा. श्री. भरगेश्वर बॅनर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी पुरस्कार स्विकारण्यासाठी बँकेचे व्हा. चेअरमन श्री सतीशजी भोसले, संचालक श्री लक्ष्मीकांतजी सोमाणी,तज्ञ संचालक श्री किशोरजी भराडिया, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अविनाश आळंदकर, वरिष्ठ अधिकारी श्री सुशिल जोशी उपस्थित होते, तसेच अविज पब्लिकेशन्स कोल्हापूरचे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे व गॅलक्सी ईनमाचे संचालक अशोक नाईक यांची उपस्थिती होती.
सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट बँकांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या अनुषंगाने हा पुरस्कार दिला जातो. सलग ४ वेळा लक्ष्मी अर्बन बँकेला हा पुरस्कार मिळाला आहे. सदरील बाब हि अभिमानास्पद आहे. सदर पुरस्कारासाठी तज्ञ समितीने बँकेच्या कार्याचे मूल्यांकन करून निवड केली आहे.
लक्ष्मी अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने अतिशय नियोजनबध्द पध्दतीने बँकेचे अधुनिक डिजीटल बँकिंग मध्ये रुपांतर केले आहे. लक्ष्मी अर्बन बँक हि सहकारी बँकामधील लातूर जिल्ह्यातील संपूर्ण डिजीटल सेवा सुरू करणारी पहिली बँक आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या मार्गदर्शन सूचना व सहकार विभागाच्या सर्व नियमांचे पालन करून लक्ष्मी अर्बन बँकेने अतिशय प्रेरणादायी वाटचाल केली आहे. आज बँकेकडे UPI, IMPS, Mobile Banking App, ATM Card, QR Code, NACH, BBPS, Franking अशा अधुनिक सुविधा कार्यान्वित आहेत.
या यशस्वी वाटचालीत सभासद, ग्राहकांची मोलाची साथ व बँकेच्या कर्मचारी वर्गाने संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली केलेले काम तसेच बँकेचे स्थानिक सल्लागार, पिग्मी प्रतिनिधी व हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे बँकेस राष्ट्रीय स्तरावरचा बँको पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे मत, बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.
श्री अशोक अग्रवाल यांनी संचालक मंडळ, सभासद, ग्राहक व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
