माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
रोहन क्रिकेट क्लबचे केले अभिनंदन
लातूर प्रतिनीधी :
लातूर येथील रोहन क्रिकेट क्लबने गोवा येथे झालेल्या ऑल इंडीया वेटरनर्स
क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्या बददल राज्याचे माजी वैद्यकिय
शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार
अमित विलासराव देशमुख यांनी बाभळगाव निवासस्थानी सर्व खेळाडूचे अभिनंदन
करुन पूढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी रोहन क्रिकेट क्लब, लातूरचे कमलेश ठक्कर, महेश बेबडे, अक्षय
तांदळे, सुधीर बाजुळगे, सिंकदर पटेल, सिध्देश्वर बिराजदार, रितेश पटेल,
डॉ. गणेश पवार, इम्रान पटेल, नितीन हंडाळे, सुनील पाटील, प्रा. अशोक
वाघमारे, कैलास भुतडा उपस्थित होते.
