माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बाभळगाव येथील अंगणवाडी, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळेला
आयएसओ मानांकन प्राप्त झाल्या बददल केले अभिनंदन
लातूर प्रतिनीधी :
गावातील लोकांना सामान्य प्रशासन, प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शिक्षण,
आरोग्य, पशुसंवर्धन, लघु पाटबंधारे, समाजकल्याण, कृषी, पाणीपुरवठा आणि
स्वच्छता अशा सेवा पुरवणे यासाठी दिल्या जाणारा गुणवत्ता व्यवस्थापन
प्रणालीसाठी विविध कार्यालयांना दिल्या जाणारे आय.एस.ओ.९००१:२०१५ मानांकन
बाभळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक
शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोलीस वसाहत, जिल्हा परिषद प्राथमिक
शाळा वैशालीनगर व अंगणवाडी क्रमांक २,३,४,५,६,८ यांना २६ जानेवारी रोजी
जाहीर झाल्याबद्दल
राज्याचे माजी वैद्यकिय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बाभळगाव
आयएसओ मानांकन प्राप्त झाल्या बददल अभिनंदन केले.
बाभळगाव येथील अंगणवाडी, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळेचे कामकाज आदर्श
आहे. अंगणवाडीमध्ये बालकांना देण्यात येणारी सेवा दर्जेदार आहे.
सर्वांना चांगला पोषण आहार दिला जातो, स्वच्छता व शिस्त पाळली जाते.
गावातील तीन्ही जिल्हा परीषद शाळेचे कामकाज उत्कृष्ट आहे. ग्रामपंचातने
अनेक नावीन्यपूर्ण योजना राबविल्या आहेत, गावात विविध अभिनव उपक्रम सुरू
आहेत, या सर्वांचा विचार करुन आयएसओ 9001.2015 मानांकन देण्यात आले आहे.
राज्याचे माजी वैद्यकिय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आयएसओ
मानांकन प्राप्त केल्या बददल सर्वांचे अभिनंदन केले.
यावेळी सरपंच प्रिया मस्के, उपसरपंच गोंविद देशमुख, रामचंद्र थडकर,
जहागीर पठाण, प्रताप माने, नवनाथ मस्के, अशोक नाडागुडे, सचिन मस्के,
ग्रामपंचायत अधिकारी शंकर भोसले, अंगणवाडी सुपरवायझर रोहीणी गुजोटीकर,
मुख्याध्यापीका रेखा सुडे, मुख्याध्यापक चॉद शेख, मुख्याध्यापक नाटकरे
एस.डी., सेवीका बबीता देशमुख, शारदा कासले, शोभा माळी, मैना जोशी, ज्योती
जाधव, सुनीता कदम, आदी उपस्थित होते.
