पत्रकाराचे विविध मागण्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन
लातूर : पत्रकारांच्या विविध मागण्याचे निवेदन लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाच्या वतीने राज्याचे बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी देण्यात आले.
पत्रकारिता करताना पत्रकारांना अनेक असुविधाचा सामना करावा लागत आहे. वार्तांकन करण्यासाठी पत्रकार सतत फिरत असतात त्यांना बसण्यासाठीही जागा नसते. लातूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगर परिषद, नगरपालिका, नगर पंचायत या शासकीय कार्यालयात पत्रकारांसाठी अद्यावत पत्रकार कक्षाची स्थापना करावी अशी मागणी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली आहे. तसेच शासनाच्या वतीने अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मध्ये मोफत प्रवास सवलत दिली जाते. परंतु आज शासनाने वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस घेतल्या असल्यामुळे व लाखांवर असलेल्या सर्वांना सर्व बसेस मध्ये सवलत आहे, परंतु राज्यात फक्त अधिस्वीकृतीधारक पत्रकारांची संख्या २ हजारावर असताना अनेक बसचे वाहक व पत्रकारांमध्ये सतत वाद होत असतात. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेस मध्ये पत्रकारांना मोफत प्रवास सवलत योजना लागू करावी तसेच पत्रकाराच्या पत्नीला ही मोफत प्रवास योजना लागू करावी.
रेल्वे प्रवासातील सवलत पूर्ववत चालू करून पत्रकाराच्या पत्नीलाही ५० टक्के सवलत लागू करावी अशा मागण्याचे निवेदन लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आले.
यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रविकिरण सुर्यवंशी मसलगेकर, संस्थापक सचिव दत्तात्रय जी परळकर, जिल्हाध्यक्ष संजय राजुळे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर डिगोळे, शहराध्यक्ष अमोल घायाळ, पत्रकार राम रोडगे आदींसह पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.
