लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरांच्या बाजारातील प्रस्तावित कांदा-बटाटा मार्केट व मुलांच्या वस्तीगृहाची
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडून पाहणी
संबंधितांना केल्या आवश्यक सूचना
लातूर प्रतिनिधी : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिक कार्य मंत्री व लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवार
दि. ३१ जानेवारी रोजी दुपारी लातूर शहरातील महात्मा बसवेश्वर चौक परिसरात
असलेल्या जनावरांच्या बाजारातील प्रस्तावित कांदा व बटाटा मार्केट स्थळ,
तसेच जुने भाजी मार्केट जवळील यशवंतराव चव्हाण ग्रामीण विद्यार्थी
मुलांचे वस्तीगृह, सचिव निवासस्थान जागाची पाहणी करून संबंधितांना आवश्यक
सूचना केल्या.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, प्रभारी सचिव
अरविंद पाटील, सहसचिव सतीश भोसले, संचालक सर्वश्री बालाप्रसाद बीदादा,
सुधीर गोजमगुंडे, सुभाष घोडके, शिवाजी देशमुख, बळवंत पाटील, बालाजी
वाघमारे, अनिल पाटील, युवराज जाधव, शिवाजी कांबळे, आनंद पवार, आनंद
पाटील, लक्ष्मण पाटील, श्रीनिवास शेळके, लातूर जिल्हा परिषदेचे माजी
अध्यक्ष संतोष देशमुख, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हा. चेअरमन समद पटेल,
ट्वेंटीवन शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, विलास सहकारी साखर
कारखान्याचे व्हा. चेअरमन रवींद्र काळे, राजकुमार पाटील, बी.एस पवार,
गणेश एस.आर.देशमुख, गोविंद डुरे पाटील, आदिसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे
विविध पदाधिकारी, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मार्केटिंग फेडरेशन,
सोयाबीन खरेदी केंद्र, जनावरांचा बाजार लातूरला भेट देऊन व्यवस्थापक अशोक
चिद्रे यांच्याकडून सोयाबीन हमीभाव, आवक आदिची माहिती घेऊन बारदाना मुबलक
प्रमाणात ठेवावा, मनुष्यबळ वाढवून शेतकऱ्यांचे वाहन लवकरात लवकर खाली
करावे अशा सूचना केल्या.
—
