हाडगा येथील जि.प. शाळेत हळदी कुंकू व महिला पालक मेळावा कार्यक्रम संपन्न…..
प्रतिनिधी / निलंगा : तालुक्यातील मौजे. हाडगा येथील जि.प. के. प्रा. शाळेत हळदी कुंकू व महिला पालक मेळावा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमचे उदघाटक म्हणून अन्नपूर्णाबाई वाघमारे हे उपस्थित होत्या. यावेळी राजश्री भिसे, शाळेचा लेखाजोखा सांगितले, तसेच डी. के. सूर्यवंशी यांनी शालेय गुणवत्ता बाबत मार्गदर्शन केले, या कार्यक्रमाची सुरुवात इ. आठवीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने केली. त्याच बरोबर महिलांसोबत सर्व शिक्षिका यांनी संगीत खुर्ची, तळ्यात – मळ्यात या खेळात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजना बरेवाड यांनी केले. या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे महिला सदस्या, गावातील महिला व पालक व शिक्षण प्रेमी महिला उपस्थित होत्या, सदरील कार्यक्रमासाठी लामतुरे, कांबळे, पांचाळ, व दिवे, डी. आर (मुख्याध्यापक ) मांदाडे, पाटील हे ही उपस्थित होते.