• Tue. Apr 29th, 2025

शहरातील नागरिक ठरवणार लातूर मनपाचे बजेट !

Byjantaadmin

Jan 30, 2025

शहरातील नागरिक ठरवणार लातूर मनपाचे बजेट !

अंदाजपत्रकासाठी सूचना पाठविण्याचे मनपाचे आवाहन

     लातूर/प्रतिनिधी:लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने सन २०२४-२५ चे सुधारित व सन २०२५-२६ चे मूळ अंदाजपत्रक तयार केले जात आहे.हे अंदाजपत्रक (बजेट )तयार करताना लातूरकरांच्या मनात काय आहे ? हे जाणून घेत त्यांच्या सूचनांचा अंतर्भाव त्यात केला जाणार आहे. यासाठी नागरिकांनी सूचना पाठवाव्यात,असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

       अंदाजपत्रकामध्ये शहरातील नागरिकांचा सहभाग असावा, या हेतूने मनपा गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहे.शहरातील नागरिक, सामाजिक संघटना,ज्येष्ठ नागरिकांनी अंदाजपत्रकासाठी सूचना पाठवाव्यात,असे मनपाला अपेक्षित आहे.मनपाच्या उत्पन्नात वाढ,खर्चात बचत,सेवा- सुविधांमध्ये सुधारणा तसेच शहराच्या विकासात्मक दर्जात वाढ करण्यासाठी नागरिक सूचना करू शकतात.शहरातील नागरिक आपल्या सूचना व अभिप्राय मनपाच्या  [email protected] या मेलवर तसेच मनपाच्या मुख्य कार्यालयात लेखा विभागात ठेवलेल्या सूचनापेटीमध्ये टाकू शकतात. दि.०४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नागरिक सूचना पाठवू शकतात.

  या माध्यमातून लातूरकर मनपाचे बजेट तयार करण्यात सहभागी होऊ शकतात. मनपाचे अंदाजपत्रक सर्वसमावेशक व नागरिकाभिमुख करण्यासाठी नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होत आपल्या सूचना पाठवाव्यात,असे आवाहन महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed