वारकरी संप्रदाय माणूस जोडण्याचे काम करतो – ह भ प शामसुंदर महाराज सोन्नर
: कीर्तन महोत्सव दिवस पहिला
निलंगा-महाराष्ट्रातील मराठा बहुजन समाजाला एकत्रित एका माळेत गुंफण्याचे काम मराठा सेवा संघ आणि जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद करत आहे तेच काम वारकरी संप्रदाय करत आहे.प्रत्येक माणूस जातीपातीच्या बंधनात अडकला आहे त्यातून माणसाला बाहेर काढून मानवजातीला एकत्र जोडण्याचे काम वारकरी संप्रदाय करत असतो असे प्रतिपादन शामसुंदर महाराज यांनी केले.
मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या कीर्तन महोत्सवातील पहिल्या दिवशी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती अजित माने,उद्घाटक माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, विशेष सत्कारमूर्ती विष्णू मोहिते,मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव एम एम जाधव आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना संत तुकाराम महाराजांनी कर्मकांड नाकारले,जातीभेद नष्ट करण्यासाठी तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपल्या वाणीतून समाजप्रबोधन केले यातून आदर्श पिढी निर्माण होण्यासाठी बळ मिळाले.त्यांचाच आदर्श घेऊन सर्वसामाजाने मार्गक्रमण करावे तरच समाजाची आणि राष्ट्राची प्रगती होईल असे ते बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रस्तावित बालाजी जाधव उजेडकर, सूत्रसंचालन सतिष हानेगावे,आभार प्रताप हंगरगे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डी बी बरमदे,विनोद सोनवणे, अजय मोरे,आनंद जाधव, प्रदीप कदम, ज्ञानेश्वर जाधव, इंजि मोहन घोरपडे, अनिल जाधव, संदीप खमीतकर,महेश जाधव, माधव गाडीवान, अंकुश धानुरे,संदीप पाटील, तुकाराम शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
