लातूरचा कलाकार ओम थडकर यांच्या चित्र प्रदर्शनला
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व
टवेन्टिवन ॲग्रीच्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांची भेट
लातूर प्रतिनिधी :
मुंबई येथे आयोजित इंडिया आर्ट फेस्टिवलमध्ये लातूरचे प्रतिभावान कलाकार
ओम थडकर यांच्या चित्र प्रदर्शनास राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण
सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित
विलासराव देशमुख यांनी टवेन्टिवन ॲग्रीच्या संचालीका सौ. अदिती अमित
देशमुख यांच्यासह भेट देऊन पाहणी केली. कलाकार ओम थडकर यांच्या
चित्रकृतींचे सौंदर्यशास्त्र आणि भावनात्मक गहनता पाहून कौतुक केले,
विशेषतः लातूर तालुक्यातील बाभळगाव हे त्यांचे मूळ गाव असल्याने, हा
लातूर जिल्ह्यासाठी अभिमानाचा विषय आहे असे त्यांनी म्हटले आहे.
ओम थडकर यांनी केलेली कलाकृती ही फक्त चित्र नव्हे, तर यांच्या कलेचे
चित्र कौशल्याचे दर्शन आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रात एक वेगळी कहाणी,
एक वेगळा भाव असतो. त्यांची कलाकृती कलाप्रेमींना भुरळ घालत आहे, हे
पाहून मला खूप आनंद झाल्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी म्हटले
आहे. यावेळी ओम थडकर यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वांनी
ओम थडकर यांचे चित्र प्रदर्शन पाहण्याचे आवाहन केले.
—
