• Tue. Apr 29th, 2025

विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने आयोजीत वासनगाव येथे स्वयं संरक्षण प्रशिक्षण पूर्ण…

Byjantaadmin

Jan 28, 2025

विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने आयोजीत वासनगाव येथे स्वयं संरक्षण प्रशिक्षण पूर्ण केलेल्या
६७ मुलींना प्रशिक्षण पूर्णता प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले


विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने लातूर तालुक्यातील वासनगाव येथील
गणेश विद्यालय येथे आयोजित स्वयं संरक्षण प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. या
प्रशिक्षणात सहभागी झालेल्या ६७ मुलींना प्रशिक्षण पूर्णता प्रमाणपत्रे
देऊन गौरवण्यात आले.

महिला सशक्तीकरणाकडे एक पाऊल:
ट्वेंटीवन ॲग्रीच्या संचालिका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या
मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या प्रशिक्षणात मुलींना आत्मसंरक्षणाचे
विविध प्रकारचे धडे शिकवले गेले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलींचे
मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर मुलींची शारीरिक
मजबुती आणि मानसिक शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. माजी मंत्री
आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या संकलपनेतून भविष्यातही अशाच प्रकारचे
प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून फाउंडेशन महिलांच्या सशक्तीकरणासाठी व
युवकांच्या स्वंयरोजगारासाठी प्रयत्न करणार आहे.

प्रशिक्षणाचे महत्त्व:
ट्वेंटीवन ॲग्रीच्या संचलिका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या
मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या या प्रशिक्षणाचा फायदा सिकंदरपूर,
वासनगाव, चांडेश्वर आदी ग्रामीण भागातील प्रशिक्षण घेतलेल्या मुलींना
होणार आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलींमध्ये आत्मविश्वास वाढेल
आणि त्या स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम होतील.
या कार्यक्रमास संस्थेच्या समन्वयक संगीता मोळवणे, अविनाश देशमुख, सुपर्ण
जगताप, गणेश विद्यालय संस्थेचे संचालक थोरमोटे, शाळेचे मुख्याध्यापक
लखनगिरे, प्रशिक्षणक अजमेर शेख, संस्थेचे सोशल प्लॅनर गजानन बोयणे
शाळेतील कर्मचारी व विद्यार्थी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमाणपत्रवितरण सोहळा पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed