दयानंद विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत द्वितीय क्रमांकाने विजयी कामगिरी!
लातूर/ प्रतिनिधी: दयानंद विधी महाविद्यालय, लातूरच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ब्राह्मीभूत स्वामी रामानंद तीर्थ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा 2024-25 मध्ये दयानंद विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी श्री. कटारे अमित शिवाजी आणि कु. पाथरुडकर कस्तुरी श्रीकृष्णा यांनी द्वितीय पारितोषिक पटकावत 4000 रू रोक बक्षिस आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
ही स्पर्धा नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स कॉलेज, नांदेड यांनी आयोजित केली होती. “एक देश – एक निवडणूक: योग्य की अयोग्य?” या विषयावर या विद्यार्थ्यांनी प्रभावी व प्रभावशाली मांडणी करत स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले.
या यशामागे दयानंद शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाचे अमूल्य सहकार्य आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पूनम नथानी मॅडम यांचे सततचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले आहे. तर डॉ. प्रमोद शिंदे संयोजक, सांस्कृतिक विभाग प्रमुख यांनी स्पर्धे मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांनी महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
