चारचाकी गाड्याना थांबवून प्रवाशांना धमकावून जबरदस्तीने सोन्याचे दागिने चोरणाऱ्या तीन आरोपीतांकडून 6 लाख 76 हजार रुपयांचे 9.4 तोळे सोन्याचे दागिनेसह अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*
लातूर – याबाबत थोडक्यात माहिती की, काही दिवसा पूर्वी पोलीस ठाणे रेणापूर हद्दीमध्ये लातूर ते रेणापूर रोड जाणारे रोड वरील बोरवटी गावा जवळ अज्ञात आरोपींनी कार मधून जाणारे दांपत्याना अडवून त्यांना धमकी व धाक दाखवून जबरदस्तीने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने चोरून नेहल्याचे दोन घटना घडल्या होत्या. त्यावरून पोलीस ठाणे रेणापूर येथे कलम 309(4), 351(2), 351(3), 3(5) भारतीय न्याय संहिता व 392, 32 भादवी प्रमाणे 2 गुन्हे दाखल झाले होते.
सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले होते. त्यावरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथक तयार करून त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या. सदर पथका कडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात बातमीदार नेमून तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी परिश्रम घेण्यात येत होते. वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी केलेल्या परिश्रमामुळे पथकांना गुप्त बातमीदाराकडून मोटरसायकल वर येऊन कार चालकांना अडवून त्यांना धमकी, धाक दाखवून, जबरीने सोन्या-चांदीचे दागिने लुटणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली.
सदर माहितीची बारकाईने अभ्यास व विश्लेषण करून मोटरसायकल वर येऊन सदरचे गुन्हे करणाऱ्या आरोपीना निष्पन्न करून, सदर आरोपींना दिनांक 17/01/2025 रोजी त्यांच्या राहते ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे.सदर पथकांनी अतिशय कुशलतेने व उत्कृष्टपणे नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन नमूद आरोपीला गुन्ह्यात चोरलेले सोन्याचे 9.4 तोळे वजनाचे 06 लाख 76 हजार रुपयाचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.
1) अमोल सुभाष राठोड, वय 27 वर्ष, राहणार नेहरूनगर तांडा तालुका रेणापूर.
2) अभय उर्फ राहुल संतोष चव्हाण, वय 21 वर्ष, राहणार नेहरूनगर तांडा तालुका रेणापूर.
3) कृष्णा राजूभाऊ ढमाले, वय 25 वर्ष, राहणार बोरवटी तालुका जिल्हा लातूर.
यांना ताब्यात घेवुन
मुद्देमाल जप्त करून नमूद गुन्ह्यात अटक करणे कामी पोलीस ठाणे रेणापूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदर कारवाईत पोलीस ठाणे रेणापूर लातूर येथील 2 जबरी चोरीचे गुन्हे उघड झाले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे रेणापूर चे पोलीस अधिकारी अमलदार करीत आहेत.सदरची कारवाई वरिष्ठांचे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार सूर्यकांत कलमे, योगेश गायकवाड, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, प्रदीप चोपणे यांनी केली आहे.
