जय भारत कॉलेज ऑफ फार्मसी, दापका, ता. निलंगा येथे इंडक्शन प्रोग्राम, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा व फ्रेशर्स पार्टी संपन्न
निलंगा-जय भारत कॉलेज ऑफ फार्मसी, दापका, ता. निलंगा येथे डी फार्मसी व बी फार्मसी च्या नवीन प्रवेशित व बाकी सर्व विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा व फ्रेशर्स पार्टी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेचे कार्याध्यक्ष श्री वसंतराव पाटील साहेब व प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.या निमित्ताने कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून निलंगा शहरातील सुप्रसिद्ध डॉ.मा.श्री. सायगावकर साहेब, माजी वैद्यकीय अधीक्षक हे उपस्थित होते, डॉ.साहेबानी या प्रसंगी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास तसेच शिक्षणासोबत संस्कार, कामातील प्रामाणिकपणा, व यशाचा गुरु मंत्र, अशा विविध विषयावर मार्गदर्शन केलं. प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण शिंदे सर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करत कार्यक्रमाबाबत प्रास्ताविक मांडलं सोबत व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष, तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.राजेश्वरराव पाटील साहेब,विश्वस्त श्री. भोईबार सर व श्री. रेड्डी सर यांच्यासह समस्त कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी उत्तम असा प्रतिसाद नोंदवत कार्यक्रमांमध्ये विविध रंग भरले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डी फार्मसी व बी फार्मसी च्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
