विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन
वैशालीताई देशमुख यांची वेणुताई गर्ल्स, बॉईज हॉस्टेलला सदिच्छा भेट
लातूर प्रतिनिधी:
लातूर शहरातील ट्युशन क्लासेस परिसरातील वेणुताई गर्ल्स, बॉईज हॉस्टेलला
विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव
देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली़.
शिक्षणाची पंढरी असलेल्या लातूरमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात
असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी, विद्यार्थीनी शिक्षणासाठी
लातूरला येतात़ शहरातील नामवंत शाळा, महाविद्यालयात तसेच क्लासेसमध्ये
प्रवेश घेतात़ विद्यार्थी, विद्यार्थीनींना गुणवंत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध
झाले़ त्यांना राहण्यासाठी उत्तम हॉस्टेलही हवे़ ती गरजही वेणुताई
गर्ल्स, बॉईज हॉस्टेलने पूर्ण केली़. श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख
यांनी वेणुताई गर्ल्स, बॉईज हॉस्टेला सदिच्छा भेट देऊन तेथील सुविधांची
पाहणी केली़, हॉस्टेलमधील विद्यार्थीनींशी संवाद साधला़.
यावेळी माजी महापौर प्रा़.डॉ़.स्मिता खानापूरे, श्रीमती शारदाताई
देशमुख, वेणुताई गर्ल्स, बॉईज हॉस्टेलचे संचालक प्रा़. विजय जाधव,
सौ़.श्वेता जाधव, धनंजय जाधव, रामेश्वर जाधव, लक्ष्मण सरवदे, महेश
नागलगावे, हॉस्टेलमधील विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या़
