प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची नवीन इमारत सेवेसाठी लोकार्पण करावे- प्रा. अण्णासाहेब मिरगाळे
निलंगा – निलंगा तालुक्यातील मौजे नणंद येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन दुमजली इमारतीचे बांधकाम होऊन एक वर्ष झाले असून अद्यापपर्यंत ही इमारत सामान्य लोकांच्या रुग्णसेवेसाठी सुरू करण्यात आलेले नाही. संबंधित कामातील पेव्हर ब्लॉक फुटून गेले आहेत, गिलावा व्यवस्थित केलेला नाही, स्लॅब मधून काही ठिकाणी पाणी खाली गळत आहे. अशा गोष्टीची तात्काळ दुरुस्ती करून सामान्य लोकांच्या रुग्णसेवेसाठी तयार करण्यात आलेली इमारत गेली एक वर्षापासून धुळखात पडून आहे. तरी मेहरबान साहेबांनी संबंधित गुत्तेदारास निकृष्ट झालेले काम तात्काळ दुरुस्त करून सामान्य लोकांच्या रुग्ण सेवेसाठी लोकार्पण करावे अशी विनंती युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांनी गटविकास अधिकारी यांना केली आहे.
