जागृती शुगर उस पुरवठा शेतकऱ्यांना ३ हजार रुपये पेक्षा अधिक भाव देणार
जागृती शुगरच्या नुतन कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचा शानदार शुभारंभ
चालु गाळप हंगामातील ५ लाख ७५ हजार उस उत्पादित केलेल्या साखर पोत्याचे पूजन संपन्न

देवणी
शेतकऱ्यांच्या जिवनात आर्थिक क्रांती घडवून आणणारा जागृती कारखाना चालू गळीत हंगामात उसाला कमीत कमी 3000 रुपये प्रती टन दर देणार असुन शेतकऱ्यांचे आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य यासह सामाजिक जिवनमान उंचावण्यासाठी मांजरा परिवारातील सर्व कारखाने प्रयत्नशिल राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री तथा जागृती शुगर चे संस्थापक अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख यांनी गुरुवारी येथे बोलताना केले ते देवणी तालुक्यातील
तळेगाव तालुका देवणी येथील जागृती शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज येथील नूतन काँम्प्रेस्ड बायोगँस प्रकल्पाच्या शानदार सोहळ्याचे उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार धीरज विलासराव देशमुख, तर विशेष उपस्थिती म्हणुन माजी आमदार अँड त्र्यंबक भिसे, जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, रेणा साखर चे माजी चेअरमन
यशवंतराव पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, रेणाचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव ट्वेंटी वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उदगीर बाजार समितीचे सभापति शिवाजी हुडे उपसभापती प्रीती भोसले,रेणाचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख जिल्हा बँकेचे संचालक अशोकगोंवीदपुरकर, जयेश माने पृथ्वीराज शिरसाठ, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ स्वयंप्रभा पाटील श्रीमती लक्ष्मीबाई भोसले ,मारोती पांडे राजकुमार पाटील व्यंकटराव बिरादार मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शामराव भोसले, उपाध्यक्ष सचिन पाटील, शिलाताई पाटील, बालाजी बिराजदार, संभाजी रेड्डी, उजाला बायो एनर्जीचे सी इ ओ डॉ आलोक अग्रवाल, उजाला चे संचालक कीर्ती प्रजापती,जागृती शुगर चे जनरल मॅनेजर गणेश येवले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
शेतमालावर प्रक्रिया करणारी कारखानदारी सक्षम होण्याची गरज-माजी मंत्री दिलीपराव देशमुख*
यावेळी बोलताना दिलीपरावजी देशमुख म्हणाले की कारखाने हे समाजातील प्रत्येक घटकाला दिर्घकाळ मदत देणारे घटक आहेत. शासनाच्या तुटपुंज्या मदतीची अपेक्षा न ठेवता शेतकऱ्यांनी स्वावलंबी बनले पाहिजे.उस हे उर्जा निर्माण करणारे पिक आहे.त्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. शेतमालावर प्रक्रिया करणारी कारखानदारी सक्षम होणे आवश्यक असुन त्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक चांगले दिवस येणार आहेत.अधिकाधिक भाव देताना कारखान्यांनी आपले अर्थकारण बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. असे सांगुन जागृती शुगर उस उत्पादक शेतकऱ्यांना उसाला कमीत कमी ३ हजार रुपये प्रति मेट्रिक टन भाव देणार असल्याचे सांगून जागृति शुगर ने नेहमीच शेतकऱ्यांना अधिक भाव देण्याचा प्रयत्न केला असून यावर्षी योग्य भाव देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले
उर्जा क्षेत्रात जागृती शुगर अव्वल स्थानी-माजी आमदार धीरज देशमुख
यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख म्हणाले की आगामी काळात कारखान्यांनी हरित ऊर्जा क्रांती करण्याची आवश्यकता असुन त्यादृष्टीने मांजरा परिवाराने आगामी दहा वर्ष डोळ्यासमोर ठेवून नियोजन सुरू केले आहे. आपला भाग ग्रीन बायो एनर्जीची राजधानी होणे अपेक्षित आहे.उप पदार्थ उत्पादनात वाढ करुन साखर उद्योगाने स्वयंपुर्ण होणे आवश्यक असुन त्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक दर देणे शक्य होणार आहे. उर्जा क्षेत्रात जागृती शुगर ने अव्वल स्थान पटकावले आहे असे सांगून लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांनी जी १९८४ पासून या साखर कारखानदारीत जी शिस्त घालुन दिली आहे त्याच पद्धतीने माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब माजी मंत्री आमदार अमितजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली परिवारातील सर्व साखर कारखाने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करत उपपदार्थ प्रकल्प सुरू करून शेतकऱ्यांना अधिकाधिक भाव देण्याचा प्रयत्न करत आहेत आगामी काळात परिवारातील सर्वच साखर कारखान्यानी हरित ऊर्जा क्रांती करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे असे ते यावेळी म्हणाले .
जागृतीने १४ वर्षात आधार विश्वास दिला
प्रास्ताविक करताना जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांनी जागृती शुगरच्या १४ वर्षाचा कालखंडात कारखान्याने अतिशय सूक्ष्म नियोजन पारदर्शकता ठेवून माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले कारखान्याने नविन तंत्रज्ञान विकसित करून उपपदार्थ प्रकल्प कार्यान्वित केल्याने उसाला योग्य भाव देण्यात आला जिल्हाभरात कधी काळी १० लाख टन उसाचे गाळप व्हायचे आज ७० लाख टन उत्पादनाची क्षमता झालेली आहे यामुळे १० पट एरीकेशन वाढले आहे असे सांगून जागृति शुगर ने नेहमीच उस उत्पादक शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना एफ आर पी पेक्षा अधिक दर देत लोकांचा विश्र्वास संपादन केला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमाचे आभार जनरल मॅनेजर गणेश येवले यांनी मांडले
यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक संभाजी सुळ जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव रेणा चे कार्यकारी संचालक बी व्ही मोरे विलास साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक देसाई, मांजरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पंडित देसाई, विलास साखर कारखान्याचे युनिट २ चे कार्यकारी संचालक श्री पवार मारुती महाराज साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे, मांजरा ( कंतेश्वर) साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक वाकडे माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी, लातूर तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष घोडके, उदगीर काँग्रेस तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दिलीप पाटील, चांदपाशा इनामदार, अँड श्रीरंग दाताळ, सचिन दाताळ, सुपर्ण जगताप, बालाजी कारभारी,मालबा घोनसे राम भंडारे अनिल पाटील, विजय पाटील, संजय रेड्डी शेषराव पाटील, बालाजी बोबडे, विलास, मांजरा, रेणा, जागृती शुगर, मारुती महाराज बाजार समिती लातूर, उदगीर बाजार समितीचे सन्माननीय संचालक मंडळ उस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
——
जागृती शुगर च्या चालु गाळप हंगामात उत्पादित झालेल्या ५ लाख ७५ हजार (प्रती ५० कीलो) साखर पोत्याचे पूजन यावेळी कारखान्याचे संस्थपक अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले