विलासराव देशमुख फाउंडेशनचे महिला सशक्तीकरणाचे उल्लेखनीय पाऊल:
चांडेश्वर येथे शिलाई प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महीलांना प्रमाणपत्र प्रदान
लातूर प्रतिनिधी:
विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने लातूर तालुक्यातील चांडेश्वर
येथे सुरू करण्यात आलेल्या मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्राचा यशस्वी समारोप
सोहळा पार पडला, या कार्यक्रमात प्रशिक्षण पूर्ण घेतलेल्या ५८ महिलांना
प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रशस्तिपत्रे देऊन गौरवण्यात आले आहे.
महिला सशक्तीकरणाकडे एक पाऊल
विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने ट्वेंटीवन ॲग्री लीच्या
संचालिका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या
या प्रशिक्षण केंद्रात महिलांना ३ महिन्यांचा शिलाईचे व्यावसायीक
प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात शिलाईच्या विविध पद्धती,
डिझाइनिंग आणि कटिंग यासंबंधीचे सखोल ज्ञान महिलांना देण्यात आले.
विलासराव देशमुख फाउंडेशनने चांडेश्वर येथील महिलांना स्वावलंबी
बनविण्यासाठी व्यवसायीक प्रशिक्षण देण्यासाठी हा उपक्रम राबवीला आहे.
प्रशिक्षणार्थी महिलांचा उत्साह:
विलासराव देशमुख फाउंडेशनच्या या मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण
केंद्रामध्ये ५८ महिलांनी आपला सहभाग घेतला. या महिलांना प्रशिक्षण
देण्यासाठी प्रेमा ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली होती. या उपक्रमात ३
महिन्याच्या कालावधीत तेथील महिलांना शिलाई कामातील सर्व प्रकारची कला,
वेगवेगळ्या पद्धतीने शिलाईचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तीन महीन्याचा
प्रशिक्षण कालावधी पूर्ण केलेल्या महिलांचा गुणगौरव व प्रमाणपत्र वितरण
सोहळा घेण्यात आला.
या प्रसंगी विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या समनव्यक संगीता मोळवणे,
गावचे सरपंच चंद्रकांत नलावडे, उपसरपंच सुबोद्दीन शेख, अविनाश देशमुख,
ट्रेनर प्रेमा ठाकूर, गजानन बोयणे व सर्व प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित
होत्या.
