राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा
निलंगा प्रतिनिधी/ राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचा जन्मोत्सव निलंगा शहरात मराठा सेवा संघाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. निलंगा शहरातील राजमाता जिजाऊ चौक येथे झेंडा वंदन करून माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समाजबांधवांनी अभिवादन केले तसेच फटाक्यांची आतषबाजी करत ‘जय जिजाऊ जय शिवराय’,’तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय’,छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अश्या घोषणा देऊन उपस्थितांनी परिसर दणाणून सोडला होता.राजमाता जिजाऊ चौक येथील जिजाऊ सृष्टी सभागृहात उपस्थित मान्यवरांनी जिजाऊ माँसाहेब यांच्या जीवन चरित्रावर आपली मते मांडून इतिहासात उजाळा दिला.यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव एम एम जाधव,जिल्हा संघटक विनोद सोनवणे,तालुकाध्यक्ष शेषराव शिंदे,तालुका सचिव इंजि मोहन घोरपडे, कार्याध्यक्ष आर के नेलवाडे, शहराध्यक्ष डॉ.उद्धव जाधव,जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे डी बी बरमदे, अनिल जाधव,प्रकाश सगरे, अजय मोरे,डी एन बरमदे, आर एन बरमदे,प्रकाश सगरे,पत्रकार संजय इंगळे, डॉ. नितीन चांदूरे,दत्तात्रय बाबळसुरे, किरण धुमाळ,सुबोध गाडीवान,नयन माने, सचिन नाईकवाडे,प्रताप हंगरगे, संदीप खमीतकर,अमोल सूर्यवंशी,महेश जाधव,ओम नाईकवाडे,सुधाकर धुमाळ,जनार्धन चव्हाण,धनाजी चांदूरे आदी समाजबांधव उपस्थित होते.
