व्यवसायाला आधुनीक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक -विजयकुमार पाटील निलंगेकर
निलंगा प्रतिनिधी व्यापार उद्योगात भारतीय व्यापारी परंपरागत व्यापार पद्धतीत बदल करणे आवश्यक असून बदलत्या काळाप्रमाणे व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील निलंगेकर फार्मसी मॅनेजमेंट कोर्सच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले
महाराष्ट्र फार्मसी कौन्सिल व लातूर जिल्हा केमिस्ट अँड असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने निलंगा येथील महाराष्ट्र फार्मसी कॉलेजमध्ये एक दिवशी फार्मसी मॅनेजमेंट कोर्स कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलताना निलंगेकर म्हणाले की आज जागतिक स्पर्धेचे युग आहे व्यवसायाचे स्वरूप बदलले आहे रोज नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे आज भारतीय व्यापारी परंपरागत व्यापारात गुंतून राहुन चालनार नाही ऑनलाइन मार्केटिंग घराघरात पोहोचली आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी व्यवसायात रोज नवीन तांत्रिक बदल स्वीकारून तंत्रज्ञानाची जोड देत अपडेट होणे आवश्यक आहे फार्मसी कॉनशिलच्या ड्रग इन्फॉर्मेशन माध्यमातून महाराष्ट्रातील फार्मासिस्ट आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांना आधुनिक प्रशिक्षण दिले जात आहे हा चांगला उपक्रम असल्याचे यावेळी विजयकुमार पाटील निलंगेकर यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष रामदास भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून फार्मसी कॉलेजचे प्राचार्य भागवत पौळ बी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ एस एस पाटील प्राचार्य विजय येलवंते प्रा डि आर कवडेवार प्रा प्रताप भोसले संघटने जिल्हा उपाध्यक्ष ओम बाहेती अनिल स्वामी नागेश स्वामी तालुकाध्यक्ष बालाजी थेटे आदी उपस्थित होते
सदर फार्मसी मॅनेजमेंट कोर्ससाठी निलंगा औसा शिरूर अनंतपाळ तालुक्यातील फार्मासिस्ट बांधवांनी सहभाग नोंदवला यावेळी औसा तालुका अध्यक्ष संजय भालकीकर शिरुर अनंतपाळ तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील प्रकाश रेड्डी राजेंद्र धुत सोमनाथ आग्रे बाबुराव महाजन वैभव पाटील हंसराज शिंदे ओम आग्रे संजय माने विरभद्र आग्रे मनोज पाटील हर्षवर्धन सातपुते विशाल नेलवाडे दिपक नाईक भाग्यश्री मांजरीकर आदी उपस्थित होते
