महाराष्ट्र महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथ संचलनासाठी निवड
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका कु. राऊ बाळासाहेब सोळुंके हिची राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथ संचलन २०२५ साठी निवड झाली आहे. या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. विजय पाटील निलंगेकर यांनी विद्यार्थिनीचे व रासेयो विभागाचे अभिनंदन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधव कोलपुके, सचिव श्री. बब्रुवानजी सरतापे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, डॉ. भास्कर गायकवाड, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ सुभाष बेंजलवार, डॉ. विठ्ठल सांडूर, प्रा. विश्वनाथ जाधव, प्रा श्रीकृष्ण दिवे इत्यादींची उपस्थिती होती.
२६ जानेवारी २०२५ रोजी राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक परेड होणार असून दिनांक १७ ते २६ जानेवारी २०२५ या १० दिवसांच्या कालावधीत स्पोर्ट्स काॅम्प्लेक्स विद्यानगरी, कलिना मुंबई येथे तालिम शिबिरात ती सहभागी होणार आहे. यासाठीही संस्थेचे अध्यक्ष मा. विजय पाटील निलंगेकर, प्राचार्य डॉ माधव कोलपुके व महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
