स्वा.रा.ती.म. विद्यापीठ नांदेड उन्हाळी २०२४ परीक्षेच्या गुणवत्ता यादीत ‘महाराष्ट्र’ चे दहा विद्यार्थी चमकले
निलंगा- येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांनी स्वा.रा.ती. मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या उन्हाळी- २०२४ परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीत बी.ए.शाखेतील कु. गुमटे आरती लक्ष्मण हिने ८७.६९ टक्के गुण प्राप्त करून विद्यापीठात तृतीय क्रमांक पटकावला. बी.सी.ए. विभागातील कु. पठाण साजिया दाऊद हिने ८९.५८ टक्के गुण प्राप्त करून प्रथम तर कु. शेख नेहा अब्दुल ८९.०८ टक्के गुण मिळवून विद्यापीठातून दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. एम. एस्सी (संगणकशास्त्र) मधून कु. रणखांब ऐश्वर्या व्यंकट हिने ८५.२४ टक्के गुण प्राप्त करून विद्यापीठातून द्वितीय येण्याचा मान प्राप्त केलेला आहे. महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या बी.व्होक(WPT)शाखेतील पहिले तीन विद्यार्थी कु. सावरे देवकी जनार्दन (८६.७८), शेख अफनान खुदबोद्दिन (८६.७३) आणि पांचाळ विशाल शिवाजी (८२.६०) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. त्याचबरोबर बी.व्होक(FPPS ) शाखेत कु. बिराजदार वैष्णवी मयूर(९०.६९), कु. शिंदे मयुरी मोहन (८७.४७),कु. तांबरवाडे अश्विनी नामदेव(८६.७६) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या परंपरेत यशाचा तुरा खोवला आहे. या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करून महाविद्यालयाची यशाची परंपरा अखंडितपणे चालू ठेवलेली आहे, याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर, सचिव बब्रूवानजी सरतापे, प्राचार्य डॉ.एम. एन. कोलपुके, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी शिक्षणासाठी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत.
