विलासराव देशमुख फाउंडेशनचा महिला सशक्तीकरणाचा नवा उपक्रम
लातूरमध्ये मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण केंद्र सुरू
लातूर प्रतिनिधी:
विलासराव देशमुख फाउंडेशनने महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने आणखी
एक पाऊल पुढे टाकले आहे. ट्वेंटीवन ॲग्रीच्या संचलिका सौ.अदिती अमित
देशमुख यांच्या संकल्पनेतून लातूर शहरात महीलांना स्वंयरोजगार आणि
स्वालंबनासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात करण्यात येत आहे. या
अंतर्गत लातूर मधील औसा रोड येथे विलासराव देशमुख फाऊंडेशन व अपर्णा वाघे
मेकओव्हरच्या वतीने महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी मोफत ब्युटी पार्लर
प्रशिक्षण केंद्राची सुरूवात करण्यात आली आहे.
महिला सशक्तीकरणाकडे एक पाऊल:
ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही महिलांसाठी रोजगाराच्या संधी कमी असतात,
या पार्श्वभूमीवर विलासराव देशमुख फाउंडेशन महिलांना मोफत प्रशिक्षण देऊन
स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे. या प्रशिक्षण
केंद्रामध्ये महिलांना पार्लर विषयीची प्राथमिक माहिती देऊन प्रशिक्षण
दिले जाणार आहे. यामध्ये वॅक्सिंग, विविध हेअर कट, मॅनिक्युअर,
पेडिक्युअर, थ्रेडिंग, मेकअप, फेशियल याविषयी प्रशिक्षण देण्यात येणार
आहे.
प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ:
या मोफत ब्युटी पार्लर प्रशिकक्षण केंद्राच्या शुभारंभ कार्यक्रमास
संस्थेच्या समन्वयक संगीता मोळवणे, गणेश एस.आर.देशमुख, प्रशिक्षक अपर्णा
वाघे, रेणूका शिंदे, अविनाश देशमुख, श्रीमती नागरगोजे, श्रीमती माने,
गजानन बोयणे तसेच या परीसरातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
