माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शिरूर ताजबंद येथील
निवासस्थानी दिली भेट, सहकार मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल
सत्कार करून त्यांना दिल्या शुभेच्छा
लातूर प्रतिनिधी : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज शनिवार
दि. ४ जानेवारी रोजी दुपारी सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या
शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवासस्थानी जाऊन सहकार मंत्रीपदी निवड
झाल्याबद्दल त्यांचा यथोचित, सन्मान व सत्कार करून त्यांना शुभेच्छा
दिल्या. त्यांच्याशी सहकार, सामाजिक प्रश्न, समाजकारण आदि विविध विषयावर
चर्चा केली.
यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आमदार सुधाकर भालेराव, विलास
को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हा. चेअरमन समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हा.
चेअरमन विजय देशमुख, माजी सभापती शिवानंद हेंगणे, अहमदपूर तालुका
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, उदगीर कृषी उत्पन्न
बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष
कल्याण पाटील, पद्माकर उगिले, प्रा. शिवाजीराव मुळे, चंद्रकांत गंगथडे,
संतोष बिरादार आदिसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी
उपस्थित होते.
