सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा शिरूर अनंतपाळ तालुक्यामध्ये सत्कार
शिरूर अनंतपाळ : निलंगा येथील मुस्लिम बांधवाच्या
इज्तेमासाठी जात असताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शिरूर अनंतपाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयाला धावती भेट दिली. याप्रसंगी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष तथा प्रवक्ते श्री सुरज दादा चव्हाण यांनी स्वागत केले.
शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या विकासासदंर्भात चर्चा केली. शिरूर अनंतपाळ येथील कृषी, उत्पन्न बाजार समिती सध्या डबगाईला आली असल्यामुळे सहकार मंत्री यांनी मदत करून चालू करण्यासाठी येथील व्यापारी व कार्यकर्तानी निवेदन देऊन मदतीची मागणी केली. याप्रसंगी तहसीलदार गोविंद पेदेवाड, पोलीस निरीक्षक विठ्ठलराव दराडे, पो. उप नि. गजानान अनासपुरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री विठ्ठलराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अतुल माने पाटील, शहराध्यक्ष अनिल देवंगरे, प्रदेश सचिव श्री तुषार मादळे, ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष श्री ज्ञानोबा मोगले, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष अब्दुल अजीज मुल्ला, महेताब शेख, सुचित लासुने, माधव संभाळे, बाळाभाऊ शिवने, विवेक घारोळे चंद्रकांत कांबळे, औदुंबर शिंदाळकर, केदार लोंढे, आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे शिरूर अनंतपाळ नगरीत अगमन होताच फटाक्याची अतिषबाजी करून त्यांना पुस्तक देऊन जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला.
