मैदानी व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये निलंगा नगर परिषदेने भाग घेऊन सर्वसाधारण विजेतेपद पटकावले
निलंगा (प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग अंतर्गत जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा लातूर जिल्हा 2024 अंतर्गत घेण्यात आलेल्या मैदानी व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये निलंगा नगर परिषदेने भाग घेऊन सर्वसाधारण विजेतेपद पटकावले .
महाराष्ट्र शासन नगर विकास विभागा अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या लातूर जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा मध्ये निलंगा नगर परिषदने भाग घेऊन प्रथम व द्वितीय पारितोषक मिळवले. त्यामध्ये रस्सी खेच प्रथम पारितोषक (महिला) प्रज्ञा पाटोळे, वैष्णवी होनराव , श्रद्धा अतनुरे ,असिफा शेख .
बॉल बॅडमिंटन प्रथम पारितोषिक मुकेश सूर्यवंशी (एकेरी )
बॉल बॅडमिंटन प्रथम पारितोषिक (दुहेरी )भरत शिंदे, मुकेश सूर्यवंशी
बॉल बॅडमिंटन (महिला)प्रथम पारितोषिक प्रज्ञा पाटोळे .
कॅरम द्वितीय पारितोषिक प्रज्ञा पाटोळे .कविता वाचन द्वितीय पारितोषिक वैष्णवी होणाराव.
समूह नृत्य प्रथम पारितोषिक श्रदा अतनुरे व वैष्णवी होनराव .
बुद्धिबळ द्वितीय पारितोषिक श्रद्धा अतनुरे
वेशभूषा प्रथम पारितोषिक प्रेमनाथ केशवराव गायकवाड .
विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेऊन निलंगा नगर परिषदेने लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पदके घेण्याचा मान निलंगा नगर परिषदेने मिळवला निलंगा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेऊन पदके मिळविल्याबद्दल मुख्याधिकारी श्री डॉ. सुंदर बोंदर यांनी सर्वांचे कौतुक करून अभिनंदन केले.
