निलंगा मॅरेथॉन ग्रुपने पटकावले अल्ट्रा मेडल्स
निलंगा : निलंगा मॅरेथॉन ग्रुपच्या अल्ट्रा १३ धावपटूने दि १० डिसेंबर रोजी सिंहगड राजगड-तोरणा ही मॅरेथॉन कट ऑफ टाईमच्या पूर्ण करीत मेडल्स पटकावल्याने निलंग्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. यामुळे या टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
सिंहगड राजगड – तारणा ही अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचे दि १० डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. यात २५ किलोमीटर व ११ किलोमीटर अशी कॅटगिरी होती. या मॅरेथॉन मध्ये २५ किलोमीटर कॅटेगिरीत निलंगा मरेथॉनचे गणेश एखंडे, डॉ. ज्ञानेश्वर कदम (औराद शहजानी), डॉ. नितेश लंबे, डॉ. बिराजदार, राजकिरण, भरत सोनवणे, तर आकरा किलोमीटर डॉ. उद्धव जाधव, डॉ. सचिन डॉ खलनगरे, हरिविजय सातपुते, सुबोध गाडीवान बालाजी चोवे यांचा समावेश होता या मॅरेथॉनचा रूट सिंहगड ते राजगड असा होता. हा मार्ग शिवकालीन मार्ग, म्हणजे ही मॅरेथॉन सिंहगड च्या पायथ्यापासून सुरू होते. सिंहगडचढून झाल्यावर अतिशय जोखीमपूर्ण रस्ता सुरू होतो. फुटक्या बुरुजावरून दोरखंडाच्या साहायाने खाली उतरावे लागते, एका बाजूला हजार फूट खोल दरी तर दुसऱ्या बाजूला फक्त एक पाऊल पडेल एवढीच जागा पण, त्यावर चालताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या व त्यांच्या मावळ्याच्या प्रेरणेमुळे ही कामगिरी निलंगा मॅरेथॉन ग्रुपच्या धावपटूंनी फत्ते केले असल्याचे निलंगा मॅरेथॉन टीमचे प्रमुख गणेश एखंडे यांनी सांगितले. मॅरेथॉनचे ग्रुपचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे