• Fri. May 2nd, 2025

कुडुंबले हॉस्पिटलनी रुग्णांना चांगली सेवा द्यावी-श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर

Byjantaadmin

Dec 19, 2022

कुडुंबले हॉस्पिटलनी रुग्णांना चांगली सेवा द्यावी-श्रीमती रूपाताई निलंगेकर
निलंगा:- वैद्यकीय क्षेत्रात निलंगा येथे चाळीस वर्ष माफक दरात रुग्ण सेवा करुन दिवंगत डॉ. मल्लिकार्जुन कुडुंबले यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. हीच सेवेची परंपरा कायम ठेवून डॉ. कुडुंबले यांनी हॉस्पिटलच्या अति दक्षता विभागाच्या माध्यमातून गंभीर रुग्णांना चांगली रुग्णसेवा देऊन त्यांचे प्राण वाचवावेत असे आवाहान माजी खासदार श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर यांनी केले.
निलंगा येथे कुडुंबले हॉस्पिटलच्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा अतिदक्षता विभागाच्या उदघाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.व्यासपीठावर उदघाटक म्हणून गुरुबाबा महाराज औसेकर होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.एस.एन.जठाळ, डॉ. संतोष कवठाळे आदी मंचावर उपस्थित होते. यावेळी श्रीमती शोभा कुडुंबले, डॉ. विक्रम कुडुंबले, डॉ. प्रियंका कुडुबले, डॉ. साईनाथ कुडुंबले,डॉ. सुधा कुडुंबले व कुडुंबले परिवारांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केले. पुढे बोलताना श्रीमती रूपाताई निलंगेकर म्हणाल्या उच्च शिक्षित झालेल्या कुडूंबले परिवारातील दुसऱ्या पिढीने निलंगा सारख्या ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याने रुग्णांची सोय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुबाबा महाराज आशिर्वचन देताना म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक मिळवण्यासाठी स्वतःचे योगदान महत्त्वाचे असते. डॉ. कुडुंबले यांनी चार तप निलंग्याच्या वैद्यकीय क्षेत्रात आपले योगदान दिले आहे.तोच वसा व वारसा घेऊन डॉ.कुडुंबले यांचे दोन्ही मुले व दोन्ही सुना वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन रुग्णसेवेचे ब्रीद घेऊन निलंगा येथे सुरू केलेले कुडुंबले हॉस्पिटल चे अतिदक्षता विभाग हे गंभीर रुग्णांना वरदानच ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ.जठाळ व डॉ.कवठाळे यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक
डॉ.साईनाथ कुडुंबले व डॉ.सुधा कुडुंबले यांनी केले. सुत्रसंचलन श्रीशैल बिराजदार यांनी केले . डॉ विक्रम कुडुंबले यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *