प्रा. डॉ. गजेंद्र तरंगे यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन
निलंगा(प्रतिनिधी)येथील महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात प्रा. डॉ. गजेंद्र तरंगे लिखित ऑग्यानिक केमिस्ट्री विषयातील बेसिक ऑफ अटॉमिक स्ट्रक्चर बोडिंग अँड स्टेरिओकेमिस्ट्री, ऑरगॅनिक फंक्शनल ग्रूपस आणि ऑरगॅनिक रिअँक्शन मेक्यानिस्म या तीन पुस्तकांचे प्रकाशन महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिक्षण समितीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील निलंगेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून वृषालीताई पाटील निलंगेकर, गौतमी पाटील निलंगेकर, पृथ्वी पाटील निलंगेकर, महाराष्ट्र शिक्षण समितीचे समन्वयक प्रा. दिलीप धुमाळ, प्राचार्य डॉ एस. एस. पाटील, प्राचार्य डॉ. कोलपुके उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा डॉ गजेंद्र तरंगे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. चौधरी व डॉ. पिनमकर यांनी केल. आभार प्रा. सुनील गरड सरांनी मानले. यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.