मनपाची नविन वर्षाची ऑफर :मालमत्ता कर 75 % शास्ती माफी
* दि.25 डिसेंबर ते 05 जानेवारी 2025 पर्यंत 75% शास्ती माफी योजना लागू
* नागरिकांनी सुवर्णसंधीचा लाभ घेऊन थकीत मालमत्ता कर भरणा करावा – आयुक्त तथा प्रशासक – बाबासाहेब मनोहरे यांचे आव्हान
लातूर/प्रतिनिधी :कर संकलन व कर आकारणी विभाग लातूर शहर महानगरपालिका यांच्या वतीने वर्ष्याच्या सुरूवातीपासूनच मालमत्ता धारकासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार वेळोवेळी विविध प्रकारचे सुट व 100% शास्ती माफी योजना ही लागू करण्यात आली होती. सदरील सुट चा लाभ घेऊन आतापर्यंत 31 हजार हून अधिक मालमत्ता धरकानी आपला टैक्स भरणा केला आहे, परंतु अद्याप ही काही थकबाकीदार यांनी टॅक्स भरणा केलेले नाही. थकबाकीधारक नागरिकांसाठी मनपा सुवर्णसंधी घेऊन आले आहे .तेव्हा सर्व मालमत्ता धारकाना कळविण्यात येते की, नविन वर्षा निमित्त लागू केलेल्या ऑफर अंतर्गत दि.05/12/2024 ते 05/01/2025 या कालावधीमध्ये आपल्याकडील थकीत कर एक रक्कमी भरल्यास आकारण्यात आलेल्या व्याज/शास्ती मध्ये ७५ टक्के सूट देण्यात आली आहे.
तरी या योजनेचा सर्व मालमत्ताधारकांनी लाभ घेवुन आपल्याकडील देय कराचा भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे व 06 जानेवारी 2025 पासून सुरू होणारे जप्ती सारखी कटू कार्यवाही टाळावी असे आव्हान आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे.–
