लातुर शहर विधानसभेचे मविआ काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ.अमित विलासराव देशमुख
यांना विविध समविचारी संघटनाचा जाहीर पाठिंबा
सर्वधर्म समभावाची जपणूक करणारे लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख यांचा वारसा
आणि लातूरच्या सर्वांगीण विकासा करिता पाठिंब्याचे पत्र
लातुर प्रतिनिधी-
विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आली असून
लातुर शहर विधानसभा मतदारसंघातील मविआ काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार
माजी मंत्री आ.अमित विलासराव देशमुख यांना विविध क्षेत्रासह समविचारी
सामाजीक संघटनाकडून वाढता पाठिंबा मिळत आहे.
काँग्रेस पक्षाचे सर्व जाती धर्माना सोबत घेऊन जाण्याचे धोरण आणि याउलट
विद्यमान सरकार कडून जाती जाती मध्ये फूट पाडण्यासाठी केले जाणारे सततचे
प्रयत्न पाहता लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीत देखील
काँग्रेस मविआकडे राज्यातील मतदारांचा वाढता कल पाहयला मिळत आहे.
सर्व धर्म समभावाची जपणूक करणारे आदर्श नेतृत्व माजी मुख्यमंत्री आदरणीय
लोकनेते विलासराव देशमुख यांचा दूरदृष्टीपणा आणि आदर्श नेतृत्वाचा वारसा
सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली
आ.अमित देशमुख पुढे नेत आहेत.
राजकीय,सहकार,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे माजी
मंत्री आ.अमित विलासराव देशमुख यांना लातूरच्या सर्वांगिण विकासासाठी
भक्कम साथ मिळावी म्हणून अनेक क्षेत्रातील मान्यवर,समविचारी सामाजिक
संघटना या निवडणुकीत जाहीर पाठिंबा देताहेत.
नुकतेच लातूरच्या तिरुमला समाज शैक्षणिक व सामाजिक संस्था, अखिल भारतीय
मराठा महासंघ,मातंग मुक्ती सेना,लातुर जिल्हा चिकन व्यापारी
असोसिएशन,अखिल गुरव समाज संघटना कडून विधानसभा निवडणुकीत मविआ काँग्रेस
पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आ.अमित विलासराव देशमुख यांना जाहीर
पाठिंबा दर्शविण्यात आला आहे.याबाबतचे लेखी पत्र देखिल या संघटनेच्या
वतीने नुकतेच देण्यात आले.
लातुर विधानसभा निवडणुकीत आ.अमित देशमुख यांना पाठिंबा दिलेल्या तिरुमला
समाज शैक्षणिक व सामाजिक संस्था, अखिल भारतीय मराठा महासंघ,मातंग मुक्ती
सेना,लातुर जिल्हा चिकन व्यापारी असोसिएशन,अखिल गुरव समाज संघटनेकडून
देण्यात आलेल्या पत्रावर डॉ.रामचंद्र भांगे, गोरोबा मगर,सोमनाथ कायते,शेख
जाफर अ. करीम,गजानन पाटील,प्रवीण साळुंखे, अभिषेक देवणे,श्रीमंत सोनाळे
पाटिल, विजयकुमार भंडारकुटे,बाळासाहेब स्वामी,हाजी सय्यद रफिक,मुकेश घार,
विलास जोगदंड, संजय सुर्यवंशी, रोहित लोहकरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
—————————————–