• Tue. Apr 29th, 2025

महायुती विरूध्द महाविकास आघाडीच्या या लढाईत आपण विकासाच्या पाठीशी रहा- आ.शरणू सलगर 

Byjantaadmin

Nov 15, 2024

     ही निवडणूक नाही तर युद्ध आ.शरणू सलगर 

     निलंगा/प्रतिनिधी: येत्या २० तारखेला मतदान होणार आहे.हे मतदान म्हणजे निवडणूक नाही तर धर्मयुद्ध आहे.महायुती विरूध्द महाविकास आघाडीच्या या लढाईत आपण विकासाच्या पाठीशी रहा,असे आवाहन बसवकल्याणचे आ.शरणू सलगर यांनी केले. आ.सलगर यांनी माजीमंत्री तथा निलंगा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या आशीर्वाद यात्रेत शुक्रवारी सहभाग घेतला.साकोळ,तिपराळ,दैठणा,तळेगाव येरोळ,डिगोळ,चांभरगा,नागेवाडी, राणी अंकुलगा,उजेड व जवळगा येथे भेटी देत आ. सलगर यांनी नागरिकांशी संवाद साधला.

    ठिकठिकाणी नागरिकांशी संवाद साधताना आ.शरणू सलगर म्हणाले की,माता जिजाऊ यांनी शिवरायांवर संस्कार केले.त्याच पद्धतीने रूपाताई पाटील यांनी संभाजीराव यांच्यावर संस्कार केले आहेत.एका सुसंस्कारित व्यक्तीकडे निलंगा मतदारसंघ आपणास सोपवावयाचा आहे. स्व.श्यामाप्रसाद मुखर्जी,अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्वप्नातील भारत घडवायचा आहे.त्या दृष्टीने या निवडणुकीकडे पाहिले पाहिजे.

      निलंगा मतदारसंघात जनतेचा आ.संभाजीराव पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.विरोधी उमेदवाराची अमानत जप्त होईल एवढा हा प्रतिसाद आहे.महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आपण बाजारात भाजी घेताना विचार करतो,हे तर मतदान आहे.त्यामुळे नागरिकांनी विचार करून मतदान करावे.सीमा भागाच्या सुरक्षेसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. काँग्रेसला मत दिले तर आपले नुकसान होणार आहे.स्वतःच्या हाताने पोटच्या लेकराला विष पाजण्यासारखे हे असेल. त्यामुळे प्रत्येकाने विचार करून भाजपा महायुतीच्य पाठीशी रहावे,असे आवाहनही आ.शरणू सलगर यांनी केले.

ओबीसी हक्क परिषदेचा आ. निलंगेकर यांना पाठिंबा ..

     ओबीसी हक्क परिषदेने निलंगा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.दिल्ली येथे झालेल्या बैठकीत प्रमुख सल्लागार तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी,संस्थापक अध्यक्ष प्रदीप फाले यांच्यासह मान्यवरांनी भाजपाला राज्यात पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.त्या अनुषंगाने परिषदेचे लातूर जिल्हाध्यक्ष मोहन पोतदार यांनी पाठिंबा जाहीर करून आ.निलंगेकर यांना तसे पत्रही दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed