• Tue. Apr 29th, 2025

लातूर शहर विधानसभा मतदारसंघात खा.डॉ.शिवाजी काळगे यांच्या स्नेहभेटी,संवाद बैठकासह पदयात्रा, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Byjantaadmin

Nov 14, 2024

लातूर शहर विधानसभा मतदारसंघात खा.डॉ.शिवाजी काळगे यांच्या स्नेह
भेटी,संवाद बैठकासह पदयात्रा, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी आ.अमित विलासराव देशमुख यांना प्रचंड
मताधिकक्याने विजयी करण्याचे आवाहन

लातूर प्रतिनिधी-दि.१४ नोव्हेंबर २०२४(गुरुवार)

विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहचली असून लातूरचे नूतन
खा.डॉ.शिवाजी काळगे यांनी लातूर शहर मतदारसंघातील मतदार नागरिकांच्या
भेटीगाठीना सुरुवात केली असून मतदारांनी आपली ताकद काँगेस उमेदवारांच्या
पाठीशी उभी करावी व आ.अमित विलासराव देशमुख यांना प्रचंड मताधिकक्याने
विजयी करून राज्यात मविआ सरकार स्थापनेचा घटक बनावे असे आवाहन करीत आहेत.
शहर विधानसभा मतदारसंघातील मविआ काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमित
विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ खा.डॉ.शिवाजी काळगे यांनी काँग्रेस
पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा ऍड
जयश्रीताई संभाजीराव पाटील यांच्यासह ते आपल्या सहकार्याच्या समवेत
मतदारांच्या स्नेह भेटी,संवाद बैठका,यासह पदयात्रेच्या माध्यमातून लातूर
शहर मतदारसंघातील प्रत्येक प्रभाग आणि गावे पिंजून आहेत.
लातूरचे खा.डॉ.शिवाजी काळगे यांनी नुकतेच प्रभाग १ व १८ तसेच ८ मधील
चौदाघर मठ या ठिकाणी संवाद बैठक घेऊन मतदारांच्या अडचणी जाणून घेत आपले
उमेदवार अमित विलासराव देशमुख यांना भरभरून मतरुपी आशीर्वाद द्यावेत असे
आवाहन केले.
यासोबतच शहर मतदारसंघातील गावात त्यांच्याकडून पडयात्रेच्या माध्यमातून मतदारांशी
संवाद साधत आहेत.नुकतेच वरवंटी सह १२ नं.पाटी श्याम नगर,रायवाडी गावात
पदयात्रा काढून मतदार बंधू भगिनीशी संवाद साधला त्यांच्या पदयात्रेस
ग्रामीण भागातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळत आहे.
देशाच्या नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला
अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाले यामुळे राज्यासह लातुरात देखील काँग्रेस
पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांत आता विधानसभा निवडणुकीत अधिक उत्साह
संचारला असून लातूर मतदारसंघात काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतल्याचे
चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभा मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनि त्यांच्या उमेदवारा साठी प्रचार सभा घेऊन देखील फारसा त्यांचा
करिष्मा दिसला नाही आणि काँग्रेस मविआचे उमेदवार खा.डॉ.शिवाजी काळगे
यांना विजयी करण्यासाठी मविआ घटक पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांचे
परिश्रम आणि माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी राबवलेली
सुनियोजित प्रचार यंत्रणा महत्वाची ठरली होती. आणि आता लोकसभेच्या
निवडणूक यशानंतर सद्याच्या विधानसभा निवडणूकित आमदार अमित विलासराव
देशमुख यांच्या विजयासाठी खा.डॉ.शिवाजी काळगे यांनी देखील स्वतःला या
निवडणुकीत संपूर्णपणे झोकून दिले आहे असेच म्हणता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed