• Thu. May 1st, 2025

माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरातील शादीखाना इमारत, मोहल्ला क्लिनिक व बेघर नागरिकांसाठी निवारा केंद्र विकास कामांची केली पाहणी

Byjantaadmin

Dec 18, 2022

माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
लातूर शहरातील शादीखाना इमारत, मोहल्ला क्लिनिक
व बेघर नागरिकांसाठी निवारा केंद्र विकास कामांची केली पाहणी

लातूर (प्रतिनिधी) १८ डीसेंबर २२ :
लातूर शहरात विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत. या अंतर्गत शहरातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक परिसरात उभारण्यात येत असलेल्या शादीखाना
इमारत बांधकाम, ठाकरे चौक परिसरातील बेघर नागरिकांसाठी निवारा केंद्र (शेल्टर हाऊस) व मोहल्ला क्लिनिकच्या कामांची पाहणी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली. या पाहणी दरम्यान संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना केल्या.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी रविवार दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी लातूर शहरातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक परिसरातील शादीखाना बांधकामाची पाहणी केली. यावेळी शादीखाना येथील विविध
सदनामधील वेगवेगळया कक्षांची पाहणी केली. पुरुष कक्ष, महिला कक्ष, स्वयंपाक घर, मेकअप रूम, भोजन कक्ष, सभागृह आदींची पाहणी करून शादीखानाची वास्तू चांगली झाली असल्याचे सांगून झालेले काम आणि उभारण्यात आलेल्या सुवीधा बददल समाधान व्यक्त केले. यानंतर त्यांनी ठाकरे चौक परिसरात भेट देऊन बेघर नागरिकांसाठी उभारण्यात येते असलेल्या निवारा केंद्र (शेल्टर हाऊस) ची व मोहल्ला क्लिनिकच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.
यावेळी सदरील विकासकामे दर्जेदार व्हावीत यासाठी  संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या.
यावेळी लातूर शहर महानगरपालिकेचे शहर अभियंता नवनाथ केंद्रे, कंत्राटदार सत्तार शेख, आर्किटेक घोलप, अकबर माडजे, लातूर जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष सय्यद रफिक, युसुफ शेख, आजमुद्दीन अख्तर, गौस गोलंदाज, मधुकर काळजाते आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *