मतदारसंघाच्या सुसंस्कृतपणावर घाला घालणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा- आ.निलंगेकर यांचे आवाहन
निलंगा/प्रतिनिधी:या निवडणुकीत कांही वाईट प्रवृत्ती निलंगा मतदारसंघात प्रवेश करत असून नागरिकांचा बुद्धिभेद केला जात आहे.वाईट व गुन्हेगारी प्रवृत्तीतून मतदारसंघाच्या सुसंस्कृतपणावर घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे.अशा वाईट प्रवृत्तींना आळा घालून मतदारसंघाचा अभिमान व स्वाभिमान जपायचा आहे.त्यामुळे अशा प्रवृत्तींना या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवा,असे आवाहन माजीमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.निलंगा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार आ.
संभाजीराव पाटील निलंगेकर यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे.गुरुवारी अंबुलगा, काटेजवळगा,बसपुर,कलांडी, बुजरुगवाडी,केळगाव,तुपडी, हाडगा,मुबारकपूर,सिंदखेड, गुंजरगा,जामगा,सोनखेड, ताडमुगळी,हलगरा व निटूर येथे ही यात्रा पोचली.यापैकी अंबुलगा,हलगरा व निटूर येथे जाहीर सभा झाल्या.या यात्रेत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, तालुकाध्यक्ष कुमोद लोभे,औराद शहाजानी बाजार समितीचे सभापती नरसिंग बिराजदार, निलंगा बाजार समितीचे संचालक गुंडेराव जाधव यांच्यासह कालिदास रेड्डी,सुधीर काडादी,विधानसभा निरीक्षक दगडू सोळुंके,शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हरिदास साळुंके आदी मान्यवर त्यांच्या समवेत होते.
मतदारांशी संवाद साधताना आ.निलंगेकर म्हणाले की,मतदारसंघाचा व मतदारसंघातील जनतेचा विकास ही एकच प्रामाणिक भावना घेऊन मी आजपर्यंत काम करत आलो आहे.यापुढेही करणार आहे पण विरोधक भूलथापा मारत आहेत.त्यांची फसवेगिरी ओळखा आणि विकासाच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहनही आ.निलंगेकर यांनी केले.
त्यांनी सांगितले की,महायुती सरकारने नागरिकांना अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ दिला.त्यामुळे अनेकांचे जीवनमान उंचावले.हा विकास निरंतर होत रहावा यासाठी आपल्या आशीर्वादाची गरज आहे.आपण दिलेल्या जबाबदारीमुळेच या सर्व गोष्टी घडल्या.निलंगा मतदारसंघाचे नाव राज्यात आदराने घेतले जाते.विकासाचा हा वारसा पुढे नेण्यासाठी २० तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीला विजयी करा,असे आवाहनही त्यांनी केले.आ.निलंगेकर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी १२ वर्षांपासून बंद असणारा अंबुलगा कारखाना सुरू केला.त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळाला.या जोडीला शासनाच्या विविध योजनांतून शेतकऱ्यांना पाठबळ मिळाले. राजकारणात आपण नेहमीच समाजहिताला प्राधान्य दिले असल्याचेही आ.निलंगेकर यांनी सांगितले.

या आशीर्वाद यात्रेत भगवान जाधव,राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे रोहित पाटील, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष रियाज सय्यद,रिपाई आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश ढेरे,औराद बाजार समितीचे संचालक रामभाऊ काळगे, सुधाकर बिरादार,अण्णाराव बिरादार,सखाराम काळे,दत्तू आजने,सरपंच अयोध्याताई कुदले,उपसरपंच कांताबाई सूर्यवंशी,चेअरमन माणिक सूर्यवंशी,कडाजी सूर्यवंशी, शिवाजीराव वाघे,गणेश कदम, वामन भालके,माजी सरपंच बबिताताई कांबळे,संगीताताई पात्रे,संगीताताई आंबेगावे,माजी उपसरपंच वामन कांबळे,दिलीप मिरगाले,अविनाश कांबळे आदींसह भाजपा महायुतीचे पदाधिकारी आणि मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.