मतदारसंघात जातीय सलोखा जपत मुस्लिम समजाला करोडो रुपयांचा विकास निधी देणाऱ्या संभाजी भैय्याना विजयी करा- माजी बांधकाम सभापती इरफान सय्यद
निलंगा;निलंगा विधानसभा मतदारसंघात सामाजिक सलोखा गेल्या अनेक वर्षापासून जोपासण्याचे काम करणाऱ्या कधीच जातीय तेढ निर्माण होऊ दिले नाही. अशा सर्वधर्म समावेशक विचार घेऊन काम करणारे निलंगा विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना सर्वच अल्पसंख्यांक समाजाने खंबीरपणे साथ देऊन त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणावे असे आव्हान निलंगा नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती इरफान सय्यद यांनी माजी मंत्री आमदार संभाजीराव निलंगेकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत केले
पुढे बोलताना माजी बांधकाम सभापती इरफान सय्यद म्हणाले ,माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे राजकीय क्षेत्रात काम करीत असताना 80 टक्के समाजकारण आणि 20% राजकारण या सूत्राप्रमाणे काम करतात जाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम करणे हे त्यांचे वैशिष्ट्ये आहेत . मी गेल्या 24 वर्षापासून पाहतो. आणि म्हणूनच सर्व समाज घटकांना कसा न्याय देता येईल. याचा प्रयत्न नेहमी ते करत असतात सबका साथ सबका विकास या न्यायाने सगळ्या धार्मिक क्षेत्राला सर्व जातीतील लोकांना समान न्याय देतात. स्वातंत्र्याच्या 60 वर्षाच्या काळात काँग्रेसने नेहमी मुस्लिम व दलिता बद्दल बेगडी प्रेम दाखवून या दोन्ही समाज घटकाला विकासापासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे. परंतु भाजपने कसल्याही प्रकारचा धर्म आणि समाजाचा भेदभाव न करता भारतीय नागरिक या नात्याने सर्वांना समान न्याय देऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम महायुती सरकार आणि येथील आमदार माजी मंत्री संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांनी सातत्याने केले आहे. मतदारसंघात त्यांनी अल्पसंख्याक समाजासाठी अनेक योजना राबवले आहेत. निलंगा शहराबद्दलच बोलायचे झाले तर मुस्लिम समाजातील गोरगरीब जनतेला लग्न समारंभासाठी मंगल कार्यालयाचा खर्च झेपत नव्हता त्यांना समाजाचे व हक्काचे कमीत कमी भाड्यावर मंगल कार्याल्याची गरज होती. हे लक्षात घेऊन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथे भव्य दिव्य असा तीन कोटी रुपयाचा शादीखाना मंजूर करून तो बांधूनही दिला. त्यामुळे अडचणीतील गरजू मुस्लिम समाजाला त्याचा खूप मोठा फायदा आज होत आहे. दर्गा दादापीर साठी दीड कोटी रुपये त्याचबरोबर दर्गा हालकश्या बाबा साठी कंपाउंड वॉल साठी वीस लाख रुपये देण्यात आले, शिवाजीनगर येथील कब्रस्तानला साठ लाख रुपये दिले. सामान्य गरीब माणसाला त्याच्या हक्काचे घर असावे या व्यापक विचारातून त्यांनी नगर पालिकेच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेतून तीनशे घरकुल मंजूर करून दिले, मुस्लिम बहुसंख्य असलेल्या वस्त्यात रस्ते व नाल्यासाठी 30 कोटी रुपये देण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक घराला नळाने पाणी पुरवण्याचे काम निलंगा नगरपालिकेच्या माध्यमातून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले त्याचबरोबर राजकीय क्षेत्रात अल्पसंख्यांक समाजाला ज्या ज्या ठिकाणी संधी देता येईल त्या ठिकाणी संधी दिली. मागे झालेल्या निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीत मला व इसरत सौदागर यांना नगरसेवक पदासाठी संधी देऊन निवडून आणले व मला बांधकाम सभापती व त्यांना स्वच्छता सभापतीपद देऊन मुस्लिम समाजाचा एका अर्थाने सन्मानच केला आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघात सामाजिक सलोखा गेल्या अनेक वर्षापासून जोपासण्याचे काम ते करत असतात त्यांनी कधीच जातीय तेढ निर्माण होऊ दिले नाही. त्यामुळे अशा सर्वधर्म समावेशक नेत्याला या निलंगा विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना सर्वच अल्पसंख्यांक समाजाने खंबीरपणे साथ देऊन प्रचंड बहुमताने निवडून आणावे असे आव्हान शेवटी माजी बांधकाम सभापती इरफान सय्यद यांनी केले
