• Tue. Apr 29th, 2025

लाखो बहिणींची साथ, हाच सर्वात मोठा आशीर्वाद! डॉ. सौ समिधाताई अरविंद पाटील निंलगेकर

Byjantaadmin

Nov 14, 2024

लाखो बहिणींची साथ, हाच सर्वात मोठा आशीर्वाद! डॉ. सौ समिधाताई अरविंद पाटील निंलगेकर

देवणी ; धनेगांव ता देवणी येथे आज महायुतीचे  उमेदवार आमदार संभाजीराव पाटील निंलगेकर यांच्या प्रचारार्थ धनेगांव येथील  मुख्यमंत्री लाडक्या बहिणीशी संवाद साधण्यासाठी सौ डॉ. समिधाताई अरविंद पाटील निंलगेकर या आल्या होत्याभाजपा महायुती सरकार महिलाचे  ,शेतकर्‍याचे , कष्टकर्‍याचे सरकार आहे,

या सरकारने लाडकी बहिण ही योजना आणली ,वयोश्री योजना ,बचत गटाना मोठ्या प्रमाणात अनूदान देणे असेल, पदवीपर्यंत मुलींचे  शिक्षण आता मोफत झाले  आहे. लाडक्या बहिणीचे मानधन आता हे महायुतीचे सरकार आपण निवडुन द्या  सरकार आल्यानंतर दोन हजार शंभर रु करणार आहे  व आपल्या सर्वाचे लाडके भाऊ आमदार श्री संभाजीराव पाटील निंलगेकर यांनी निलंगा मतदारसंघ, लातूर जिल्हा आणि आपल्या राज्यासाठी जे काही करू शकले ते केवळ आणि केवळ आपल्या आशीर्वादांमुळेच ते शक्य झाले आहे. सध्या सगळीकडे विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून ही निवडणूक  आपल्या सर्वांसह राज्याचे देखील भविष्य ठरवणारी  निवडणूक आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचे सहकार्य आणि आशीर्वाद अत्यंत गरजेचे असून निलंगा मतदारसंघाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी येत्या २० तारखेला कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून भाजपा महायुती उमेदवार माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर याना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन सौ समिधाताई पाटील निंलगेकर यांनी उपस्थित महिला व जनतेला  केले.

यावेळी  जिल्हा परिषद माजी सदस्य  प्रंशात पाटील संरपच सौ मिनाताई परिट ,उप-संरपच  रामलिंग शेरे ,माजी उप-  संरपच  रविद्रकूमार पाटील , चेअरमन  संगाप्पा चरपले ,व्हाईस चेअरमन  अमर बिरादार , प्रंशात पाटील , सुधिर भोसले, श्री राज गूणाले,   किशोर बिरादार,  दयानंद पोतदार ,बूथ प्रमूख्ख  माधव बिरादार, लक्ष्मण पवार,  सोमनाथ बिरादार  बाळासाहेब बिरादार, नरसिंग बिरादार, जंयत पाटील , प्रणव बिरादार,   विठ्ठल बोयणे , शेटीबा पवार, अमित बिरादार, बबलु बिरादार, हरि परिट , शंकर आपटे,समाधान बिजापुरे, दिपक पवार,  हुसेन तुरे,  कल्याण डगवाले, श्रीदेवी ताई बिरादार, महादेवीताई बिरादार , सोनाली बिरादार,सौ लक्ष्मीबाई बिरादार, महादाबाई तुरे सौ,छायाताई चरपले सौ मिनाताई बोरोळे, सौ हरुबाई बिरादार सौ सरस्वती चरपले श्रीमती शुभांगी बिरादार,सौ शुंभागी चरपले  आदीसह गावातील अनेक महिला व पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed