• Tue. Apr 29th, 2025

निलंगा मतदार संघात भाजपचा झंझावात; आ.संभाजीराव व प्रेरणाताई डॉ,समिधाताई, प्राजक्ताताई,निलंगेकर यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Byjantaadmin

Nov 13, 2024

निलंगा मतदार संघात भाजपचा झंझावात; आ.संभाजीराव व प्रेरणाताई डॉ,समिधाताई, प्राजक्ताताई,निलंगेकर यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

निलंगा;एका बाजुला माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली असून त्यांना त्यांना मतदार संघात सर्वचस्थरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून दुसऱ्या बाजूला पत्नी सौ प्रेरणाताई संभाजीराव पाटील निलंगेकर, वहिनी सौ, डॉ  समिधाताई अरविंद पाटील निलंगेकर, व बहीण सौ प्राजक्ताताई मारवा निलंगेकर यांनी महिला वर्गात प्रचारात मोठी आघाडी घेतली असून महिला वर्गात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, महिलांच्या प्रश्नाला वाचा फोडत ते प्रश्न सोडविण्यासाठी शब्द मिळत असल्यामुळे महिला वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पैसे डायरेक्त खात्यावर जमा झाल्यामुळे, महिला वर्गात  महायुती शासनाचे व माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत, प्राजक्ताताई मारवा निलंगेकर म्हणतात आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकरांची मी एकटीच बहीण नाही तर लाखापेक्षा अधिक बहिणीचा आशीर्वाद माझ्या भावाच्या पाठीशी आहे असे त्या सांगतात. पत्नी प्रेरणाताई महिलांशी संवाद साधताना सांगतात

 निलंगा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या सोडवल्या. ग्रामीण महिलांचा आवाज विधानसभेपर्यंत पोहोचवला. त्यामुळे आपल्या समस्या सोडवण्यासाठी हक्काचा माणूस म्हणून माजीमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांना या निवडणुकीत प्रचंड मताधिक्क्याने विजयी करण्याचे  आवाहन सौ.प्रेरणाताई संभाजीराव पाटील निलंगेकर उपस्थित महिलांना करतात .

माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जनसन्मान पदयात्रा काढत मतदारसंघात नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक गटनिहाय बुथ मिळावे घेतले आहेत. आज निलंगा  विधानसभेच्या निवडणुकीत मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला असून निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आशीर्वाद प्रचार सभेच्या माध्यमातून निलंगा, शिरूर अनंतपाळ,देवणी या तिन्ही तालुक्यातही जवळपास सर्वच गावांना भेटी झाल्या आहेत उमेदवारी जाहीर होण्या अगोदर पासूनच भेटी गाठी सोबतच आपल्या पाच वर्षांचा कार्य अहवाल देण्यासोबतच भविष्यातील कामाबद्दलची माहिती ते देत आहेत.त्यांच्या आशीर्वाद सभेला महिला पुरुष आणि तरुणाचा प्रचंड पाठींबा मिळत आहे,ते आपल्या भाषणात सांगतात, प्रत्येक उंबरठ्याचा विकास, मराठवाडयात वॉटर ग्रीड प्रकल्प मंजूर करून शेती,उद्योगाला   शाश्वत पाणी ,  महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि प्रगतीसाठी काम केले आहे. मतदारसंघात विकास कामे करताना अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे उपक्रम आपण सातत्याने राबवले आहेत. मतदारसंघातील महिलांची लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करून घेत त्यांना लाभ मिळवून दिला आहे.भविष्यात स्त्री शिक्षणासाठी आपण काम करणार आहोत.व काँग्रेसने 60 वर्षात जेवढी कामे केली आहेत तेवढी कामे आपल्या शासनाने केवळ 10 वर्षात केली आहेत, अंबुलगा कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्याची पिळवणूक थांबली असून स्पर्धा वाढल्यामुळे अधिकचा पैसा आज शेतकऱ्यांना मिळत आहे.   प्रत्येक गावाच्या विकासासाठी काम करणे हेच आपले ध्येय असल्याचेही ते  म्हणतात व ही लढाई स्वाभिमाची असून निलंगेकर विरुद्ध देशमुख आहेआमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व महिला प्रचारात सरसावल्यामुळे संपूर्ण मतदारसंघात भाजपमय वातावरण झाले असून प्रचारात प्रचंड आघाडी घेतली आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed