• Tue. Apr 29th, 2025

युवा नेते अरविंद पाटील निलंगेकरांनी घेतले डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या पालखीचे दर्शन

Byjantaadmin

Nov 13, 2024

युवा नेते अरविंद पाटील निलंगेकरांनी घेतले डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या पालखीचे दर्शन

निलंगा; वसुंधरारत्न राष्ट्रसंत सद्गुरु १०८ ष.ब्र. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या श्री क्षेत्र कपिलधार महापदयात्रेच्या पायी दिंडीतील दुसरा रिंगण सोहळा लोखंडी सावरगा येथे संपन्न झाला. या सोहळ्याला भेट देऊन पालखीचे तसेच उपस्थित गुरुवर्यांचे दर्शन युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर  घेतले.

शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्याशी माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे अनेक वर्षापासून कनिष्ठ संबंध होते. आत्तापर्यंत शुभकार्याची सुरुवात  त्यांनी त्यांचे दर्शनाने केली आहे. शिवाय विधानसभेमध्ये त्यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी त्यांनी  केली होती. त्यामुळे शिवलिंग शिवाचार्य महाराज व निलंगेकर यांचे संबंध गेल्या अनेक वर्षापासून दृढ आहेत.

यावेळी शिवाप्पा भुरके, बसु राजुरे, रतन रेडडी, बुद्धिवंत मुळे,  इंजी कस्तुरे, अमर सोरडे, प्रसाद सोरडे, प्रकाश पटने, मनोज कोळ्ळे, शेषेराव मंमाळे, मंगेश गाडीवान, प्रमोद सोमवं, जनार्धन सोमवंशी आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed