• Tue. Apr 29th, 2025

क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा महाविकास आघाडीस पाठींबा

Byjantaadmin

Nov 12, 2024

क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा महाविकास आघाडीस पाठींबा

जिल्ह्यातील ‘मविआ’च्या सहाही उमेदवारांच्या विजयासाठी नेटाने काम करण्याचा निर्धार

लातूर -शेतकरी नेते रविकांत तूपकर यांच्या क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस महाविकास आघाडीला दि़ १२ नोव्हेंबर रोजी पाठींबा देण्यात आला़ असून लातूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सहाही उमेदवारांच्या विजयासाठी क्रांतीकारी शेतकरी संघटना नेटाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला़ 

येथील आशियाना निवासस्थानी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते सत्तार पटेल लातूर,राजेंद्र मोरे, औसा,अरुण कुलकर्णी, लातूर राजू कसबे औसा, नवनाथ शिंदे लातूर ,दत्ता किनीकर रेणापूर ,लक्ष्मण कांबळे, मारुती कसबे, प्रज्योत हुडे देवणी, अमर हैबतपूरे देवणी  यांनी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा पाठींबा महाविकास आघाडीला दिल्याचे जाहीर केले़  त्यामुळे जिल्ह्यांतील सहा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठा फायदा होणार आहे 

महायुती सरकारचे निर्णय शेतकरी विरोधी 

यावेळी बोलताना सत्तार पटेल म्हणाले, गेल्या दहा वर्षांत सरकारने शेतकर्याच्या बाबतीत घेतलेले सर्व निर्णय शेतकºयांच्याच मुळावर उठले आहेत़ दीडपट हमी भाव दिला नाही़ उत्पन्न दुप्पट करतो, असे सांगीतले परंतू, उत्पादन खर्चच चारपट करुन ठेवला़ सरकारच्या धोरणामुळे शेतकरी उद्धवस्त होत असताना सरकारच उघड्या डोळ्याने पाहात असेल तर ते आम्ही कदापिही सहन करणार नाही़ त्यामुळेच आम्ही महाविकास आघाडीला पाठींबा दिला आहे़ राजेंद्र मोरे म्हणाले, विमा कंपनी आणि सरकारचे साटेलोटे आहे़ त्यामुळे विम्याच्या बाबतीत सरकारने गांभीर्याने घेतले नाही़ शेतकºयांचे प्रश्न, आडीअडचणी सोडविण्यात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा नेहमी पुढाकार असतो़ त्यामुळेच आम्ही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा पाठींबा महाविकास आघाडीला दिला आहे़ जिल्ह्यातील महविकास आघाडीच्या सहाही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत़ यावेळी राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनंजय देशमुख, जागृती शुगरचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण मोरे, काँग्रेस मीडिया सेल चे जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी आदी उपस्थित होते़ 

सातत्याने शेतकºयांच्या बाजूने काम करण्याचे धोरण

यावेळी बोलताना माजी मंत्री सहकार दिलीपराव देशमुख म्हणाले की सातत्याने शेतकºयांच्या बाजूने काम करण्याचे आमचे धोरण आहे़ काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे, काँग्रेसेचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोल आणि आम्ही सर्वचजण शेतकºयांच्या प्रश्नांवर काम करीत आहोत़ शेतकºयांनी जेव्हा जेव्हा प्रश्न उपस्थित केले ते सर्व प्रश्न आम्ही सोडविले आहेत़ क्रांतीकारी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला त्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो़ असे यावेळी बोलताना सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed