• Tue. Apr 29th, 2025

लातूरला मिळाले एक विरंगुळा केंद्र नागरिकांना नवीन आकर्षण

Byjantaadmin

Nov 12, 2024

लातूरला मिळाले एक विरंगुळा केंद्र नागरिकांना नवीन आकर्षण

  • उद्यानात लातूरकरांना निसर्गाचा आनंद
  • उद्यान शहराच्या सौंदर्यात भर घालणार
    लातूर शहरातील प्रभाग ८ मधील महात्मा गांधी मार्केट येथे सर्व
    सोयीसुवीधायुक्त उद्यान सेवेत सुरू झाले आहे. या उद्यानाच्या माध्यमातून
    लातूरकरांना नवीन विरंगुळा केंद्र मिळाल आहे. या उद्यानात लातूरकरांना
    निसर्गाचा आनंद घेता येणार आहे. तसेच, हे उद्यान शहराच्या सौंदर्यात भर
    घालणारे झाले आहे.
    लातूर शहरातील विशेषता महात्मा गांधी मार्केट येथील व्यापारी, विदयार्थी
    आणि नागरीक यांनी ही जागा दुर्लक्षित असून या जागेवर सुशोभीकरण व्हावे
    अशी मागणी केली होती. तेथे उद्यानाची निर्मिती करण्यासाठी सुमारे ८० लाख
    २५ हजार रुपयांच्या निधी मंजूर करण्या करीता पुढाकार केला.
    उद्यानाच्या माध्यमातून अभिनव उपक्रम
    लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उद्यानाच्या माध्यमातून अभिनव उपक्रम
    साकारला आहे. उद्यानात लहान मुलांसाठी हिरवळीवर खेळण्यासाठी लॉन तयार
    करण्यात आला आहे. तसेच, विरंगुळा म्हणून फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक,
    चालण्यासाठी वॉकिंग ट्रॅक करण्यात आले आहे. व्यापारी, नागरीक, प्रवासी
    यांना निवांतपणे बसण्यासाठी विसावा व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारच्या
    वेळी भोजन करण्यासाठी व विश्रांतीसाठी मोकळी जागा विश्रांतीगृह (डायनींग
    एरिया) आहे. कौटुंबिक छोटेखानी कार्यक्रम करता यावेत यासाठी सुवीधा केली
    आहे.
    विविध फुलझाडे आणि वृक्ष लागवडीमुळे
    उद्यानाला एक वेगळीच ओळख
    उदयानात अदययावत सुवीधेसह सुशोभीकरण करण्यासाठी विविध प्रकारची फुल झाडे
    आणि वृक्ष लावण्यात आले आहेत. यामध्ये गुलाब, चाफा, मोगरा, रातराणी
    फुलझाडे आहेत तर कडेनी बांबू लावण्यात आले आहेत. उद्यानातील
    सुशोभीकरणामुळे परिसराची देखील शोभा वाढली आहे. उदयानाची देखभाल
    करण्यासाठी आवश्यक पाण्यासाठी विंधन विहीर (बोअर) घेवून पाण्याची
    व्यवस्था केली आहे.
    उद्यानातील फुलझाडांची मोहिनी, गुलाबाचा मोहक सुगंध, चाफ्याची शांत
    सुगंध, मोगऱ्याचा आणि रातराणीची सुगंध या उद्यानाला एक वेगळीच ओळख
    निर्माण करून देत आहे.
    येथे येणाऱ्यासाठी स्वच्छता गृह, पाण्याची व्यवस्था आहे. उदयानाचा वापर
    करता यावा यासाठी हेरीटेज लाईटचा वापर करून आकर्षक विद्युत रोषणाई केली
    आहे. सुरक्षा रक्षकासाठी केबीन सुवीधा असून सर्व मुलभूत सुविधा दर्जेदार
    उभारण्यात आल्या आहेत. यामुळे उदयान पाहता क्षणी मनमोहक स्थळ म्हणून
    पसंतीस पडेल असे ठिकाण झाले आहे.
    लातूर शहरात अभिनव प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे वास्तु
    विशारद पुणे येथील नामांकित श्री महेश नामपुरकर आहेत तर या प्रकल्पाचे
    बांधकाम काम अभिजीत इगे यांनी पूर्ण केले आहे. या अभिनव उपक्रमाचे लातूर
  • शहरातील व्यापारी, परिसरातील नागरिक यांच्याकडून कौतूक होत आहे.लातूरला मिळाले सुंदर उद्यान, नागरिकांना नवीन आकर्षण
  • लातूर शहरातील महात्मा गांधी मार्केट परिसरात एक सुंदर उद्यान उभारण्यात
  • आले आहे. या उद्यानाने शहराच्या सौंदर्यात भर घातली असून, नागरिकांना एक
  • नवीन विरंगुळाचे ठिकाण मिळाले आहे.
  • निसर्गाचा आनंद:
  • या उद्यानात लॉन, जॉगिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, विश्रांतीगृह आणि
  • मुलांच्या खेळण्यासाठी जागा उपलब्ध आहे. विविध प्रकारची फुलझाडे आणि
  • वृक्षांची लागवड करण्यात आली असून, उद्यानात फिरताना नागरिकांना
  • निसर्गाचा आनंद घेता येईल.
  • शहराच्या विकासातील महत्त्वपूर्ण पाऊल:
  • लातूर शहरातील व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी या जागेवर उद्यान उभारण्याची
  • मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला अनुसरून, सुमारे ८० लाख रुपये
  • खर्चून हे उद्यान तयार करण्यात आले आहे. हे उद्यान शहराच्या विकासातील एक
  • महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
  • नागरिकांची प्रतिक्रिया:
  • या उद्यानाचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते
  • उद्घाटन झाल्यापासून नागरिकांचा याकडे मोठा प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः
  • मुले आणि वृद्धांना हे उद्यान खूप आवडत आहे. उद्यानात येऊन नागरिक निवांत
  • वेळ घालवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed