• Tue. Apr 29th, 2025

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रचार रॅलीनेशहराचा पुर्वभाग महाविकास आघाडीमयमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या विजयाचा आवाज घुमला

Byjantaadmin

Nov 12, 2024

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रचार रॅलीने
शहराचा पुर्वभाग महाविकास आघाडीमय
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या विजयाचा आवाज घुमला
लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत
उमेदवार अमित विलासराव देशमुख यांनी जनसंपर्क अभियाना अंतर्गत दि़ ११
नोव्हेंबर रोजी सांयकाळी शहरातील २, ३, ४ व ७ या भव्य प्रभागांतून भव्य
प्रचार रॅली काढण्यात आली़ या रॅलीला या चारही प्रभागांतील मतदारांनी
उस्फुर्त प्रतिसाद दिला. पुरुष महिला युवती मोठया प्रमाणात या रॅलीत
सहभागी झाले होते. युवकांची संख्या लक्षणिकय होती़
प्रभाग क्रमांक ४ मधील बिलाल मस्जिद चौकात माजी मंत्री आमदार अमित देशमुख
यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले़
तेथून प्रचार रॅलीस सुरुवात तेथून इस्लामपूरा, मदनीचौक, सुफिया मस्जिद,
तथागत चौक, हेलन चौक़ प्रभाग ३ मधील तुळजाभवानीनगरपासून रॅलीचा प्रारंभ
झाला़ जयभीमनगर, इंदिरानगर, राजीवनगर, विवेकानंद चौक, प्रभाग क्रमांक ७
मधील विवेकानंद चौकापासून जिजामाता शाळा, दसरा पार्क, सिद्धार्थ सोसायटी,
डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौक, मिरकले कॉर्नर, डॉ़ ए़ पी़ जे़ अब्दुल कलाम
चौक ते मचाले, प्रभाग क्रमांक २ मधील मचालेपासून ते कृपासदन चौक, अराफत
चौक, पू़ अहिल्यादेवी होळकर चौक, संविधान चौक चौकातू प्रचार रॅली एक
मिनार चौक चौकात पोचल्यानंतर तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला़
प्रचार रॅली मार्गावर असंख्य घरांच्या छतावरुन रॅलीवर पुष्पवृष्टी
करण्यात आली, हातात फलक, झेडे घेऊन मोठया संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते
नागरीक सहभागी झाले होते. लातूर शहराचा पुर्वभाग हा लातूरचा बालेकिल्ला
म्हणून ओळखला जातो़ सोमवारी सायंकाळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख
यांच्या निघालेल्या प्रचार रॅलीने शहराचा पुर्वभाग महाविकास आघाडीमय
झाला़ युवकांचा सहभाग लक्षणिय होता़ ‘महाविकास आघाडीचा विजय असो’, ‘अमित
देशमुख तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, अशा घोषांचा संपूर्ण परिसरात
आवाज घुमला़ महिला, युवती, पुरुषही मोठ्या संख्येने प्रचार रॅलीत सहभागी
झाले होते़
या प्रचार रॅलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनिल बसपूरे,
शेतकरी कामगार पक्षाचे अ‍ॅड़ उदय गवारे, लातूर शहर लातूर शहर जिल्हा
काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर दीपक सूळ, माजी नगरसेवक
अहेमदखॉ पठाण, माजी नगरसेवक कैलास कांबळे, आसिफ बागवान, माजी माजी
नगरसेवक विजयकुमार साबदे, नगरसेवक सचिन बंडापल्ले, माजी नगरसेवक इम्रान
सय्यद, माजी नगरसेवक युनूस मोमीन, माजी नगरसेविकास रेहाना तांबोळी,
तब्रेज तांबोळी, राजू गवळी, अथरोद्दिन काजी, हकीम शेख, पृथ्वीराज सिरसाठ,
अशोक गोविंदपूरकर, प्रा़ प्रविण कांबळे, नामदेव इगे, बाबा पठाण, कमल
मिटकरी, वर्षा मस्के, शफी शेख, अ‍ॅड़ वैभव सूर्यवंशी, मोहन माने, जीवन
सूरवसे, रघूनाथ मदने, राहूल डूमणे, मोहन सूरवसे, मकबुल वलांडीकर, हरीभाऊ
गायकवाड, इस्माईल शेख, विकास कांबळे, नबी नळेगांवकर आदींसह काँग्रेस,
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव
बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, महाविकास
आघाडीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी
झाल्या होत्या़

असंख्य ठिकाणी जेसीबीद्वारे फुलांची उधळण
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रचार रॅलीच्या प्रारंभीच
हजारोंच्या संख्येत तिरंगी झेंडे घेऊन सहभागी झाले होते. रॅलीची सुरुवात
फुलाच्या उधळणीने झाली़ मदनी चौकात अहेमदखॉ युवा मंचच्या वतीने
जेसीबीद्वारे भल्या मोठ्या फुलांच्या हाराने माजी मंत्री आमदार अमित
देशमुख यांचे स्वागत करण्यात आले़ जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली़
रॅली तथागत पोचल्यानंतर तेथे पप्पूजी गायकवाड मित्र मंडळाच्या वतीने भव्य
दिव्य स्वागत करण्यात आले़ तुळजाभवानीनगरात मुळे परिवाराच्या वतीने
स्वागत करण्यात आले़ प्रभाग क्रमांक ३ मध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते राजू
गवळी यांच्या वतीने स्वागत करण्यात आले़ रॅली डॉ़ बाबासाहेब आंबेडकर
चौकात पोचल्यानंतर तेथे अ‍ॅड़ आतिश चिकटे यांच्या वतीने फुलांचा मोठा हार
घालून माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे स्वागत करण्यात आले़ जागोजागी
महिला भगिणींनी औक्षण करुन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांना आशिर्वाद
दिला़

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed