निवळीतील भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश लातूर ग्रामीण मध्ये आ. धिरज देशमुख यांना वाढता पाठिंबा
लातूर / प्रतिनिधी-
काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील निवळी (ता. लातूर) येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्या सर्वांचे लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी स्वागत केले. बाभळगाव येथे आमदार धिरज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आला. या पक्षप्रवेशामुळे निवळीत काँग्रेस पक्षाचे प्राबल्य वाढले आहे.
निवळी येथील हनुमंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली नितीन मायंदे, सुदर्शन जाधव, विठ्ठल दिवटे, गणेश मायंदे, धनराज जाधव, तात्या मायंदे, दीपक जाधव, श्रीमंत जाधव, गोविंद जाधव, गोपाळ माने, सुंदर माने, बापू मायंदे, महेश दिवटे, निलेश मायंदे, ज्ञानेश्वर मायंदे यांनी आमदार धिरज देशमुख यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार धिरज देशमुख यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
