• Tue. Apr 29th, 2025

मतदारांचा उत्साहच निलंग्याचा बदल घडविणारं…. अंबुलग्याच्या सभेत अमित देशमुखांचा विश्वास

Byjantaadmin

Nov 12, 2024

मतदारांचा उत्साहच निलंग्याचा बदल घडविणारं…. अंबुलग्याच्या सभेत अमित देशमुखांचा विश्वास 

निलंगा  : मतदारसंघात बळावलेला भ्रष्टाचार,कमिशनखोरी , दडपशाही संपुष्टात आणुन सर्वसामान्यजनतेचा आवाज विधानसभेत पाठवण्याचा चंग आता मतदारांनी बांधला आहे.मतदारसंघात पहावयास मिळत असलेला मतदारांचा उत्साहच निलंगा मतदारसंघात बदल घडविणारं असा विश्वास माजी मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला.ते काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभय साळुंके यांच्या प्रचारार्थ आयोजित अंबुलगा (बु) येथील सभेत बोलत होते.

     व्यासपीठावर काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभय साळुंके , माजी खासदार सुधाकर श्रृंगारे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर,  तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, माजी सभापती अजित माने, ॲड . नारायण सोमवंशी, शेतकरी संघटनेचे राजकुमार सस्तापुरे ,अंबादास जाधव, कुमार पाटील,डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ अरविंद भातांब्रे , पंकज शेळके , चक्रधर शेळके, महिला तालुका अध्यक्षा  आरती बालाजी भंडारे , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधीर मसलगे,सरपंच स्वाती किरण शिंदे , उपसरपंच जगदीश सगर ,गुंडेराव बिरादार, जगदीश सगर,सुभाष शिंदे, महावीर काकडे आदींची उपस्थिती होती 

पुढे बोलताना अमित देशमुख म्हणाले की , महायुतीच्या कारभाराला जनता कंटाळली असल्याचे धोतक महाविकास आघाडीच्या होणाऱ्या सभेवरुन जाणवते.डाॅ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निष्ठावंत काँग्रेसचा वारसा चालवायचा आहे.त्याची जबाबदारी आता अशोकराव पाटील यांच्याबरोबरच अभय साळुंके यांचीही आहे.सामान्य माणसांचा आवाज विधानसभेत बुलंद करण्यासाठी अभय साळुंके यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

दलित म्हणून माझी पिळवणूक…. श्रृंगारे

मी दलित असल्यामुळे माझी पिळवणूक झाली.आमदारापेक्षा खासदार पद मोठे असतांनाही केवळ मी दलित म्हणुन मला आमदारांनी वेळोवेळी दमदाटी करत मला मतदारसंघात येण्यास रोखले असा आरोप माजी खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी व्यक्त केला.यांचा बदला घेण्यासाठी लोकसभेच्या मताधिक्यापेक्षा जास्तीचे मते अभय साळुंके यांना द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पुतण्याने धोका दिला…… तुम्ही देवु नका….. अशोकराव पाटील यांची भावनिक साद 

सद्यस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.गेल्या दहा वर्षांत निलंगा मतदारसंघातील जनतेला खुप त्रास सहन करावा लागला.या त्रागातुन मुक्त होण्यासाठी बदल हवाय.मला माझ्या पुतण्या नी धोका दिला…आता अभय मी तुम्हाला (राजकीय) पुतण्या मानतो पण मला धोका होवु नये अशी भावनिक साद अशोकराव पाटील निलंगेकर यांनी माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत घातली.मी तीस वर्षापासून राजकारण करतो. काँग्रेसची संस्कृती मला माहिती आहे.तयामुळे पक्ष मला प्रदेशाध्यक्ष पदही देवु शकतात आणि सर्वजण माझ्या हाताखाली काम करतील पण याची जबाबदारी अमित देशमुख घेतील हे सांगताना मात्र प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली.

जनसेवक म्हणून सेवा करीन….अभय साळुंके 

मी पद नसताना ही तुमच्या अडीअडचणीला धावुन आलोय..आता पक्षाने मला उमेदवारी दिली असुन  तुम्ही मला मतदान करुन विजयी करा.मला दुप्पटीने काम करण्याची संधी द्या.जनसेवक म्हणून मी अविरत सेवेत राहीन असे अभिवचन अभय साळुंके यांनी मतदारांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed