• Tue. Apr 29th, 2025

पाथरवाडीतील युवाशक्तीचा भाजपला धक्का, काँग्रेसमध्ये प्रवेश करत धिरज देशमुखांना पाठिंबा

Byjantaadmin

Nov 12, 2024

पाथरवाडीतील युवाशक्तीचा भाजपला धक्का, काँग्रेसमध्ये प्रवेश करत धिरज देशमुखांना पाठिंबा

लातूर प्रतिनिधी –  लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला मोठे बळ मिळाले आहे. रेणापूर तालुक्यातल्या पाथरवाडीतील भाजपचे युवा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी बाभळगाव येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्ष आणि ग्रामीण मतदार संघाचे उमेदवार धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाचे शहर उपाध्यक्ष सोमेन वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरवाडीतील युवकांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. यामध्ये धर्मराज कुमार सुडे, दत्तात्रय हनुमंतराव मदरे, विजय शाम कांबळे, बाबुराव शिंदे, वैभव गुरमे, अभिषेक जाधव, ओमप्रकाश वलसे, सौदागर कोचकुवाड, सुजय बेंबडे, माजीद शेख, ऋषीकेश चव्हाण, सागर जाधव, अजय कोवळे, विशाल गोडभरले, योगीराज सुडे, ज्ञानेश्वर पौळ, राम पवार , ओमप्रकाश वळसे , वैभव गुरमे यांच्यासह पाथरवाडीतील बहुतांश कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

बाभळगाव येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात सर्वांचे काँग्रेसमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार धिरज देशमुख यांनी सर्व युवकांचे स्वागत करत त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रवेशामुळे लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली आहे, ज्यामुळे काँग्रेस उमेदवार धिरज विलासराव देशमुख यांना निवडणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. या पक्षप्रवेशामुळे लातूर ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसची स्थिती आणखी मजबूत झाली आहे.यावेळी रेणापूर तालुका कांग्रेसचे अध्यक्ष प्रमोद जाधव, सोमेन वाघमारे, रोहित विलास गायकवाड , सिदाजी प्रदिप पौळ, आदित्य पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed