निलंगा शहरातील जनता आ.संभाजीराव पाटील यांच्या पाठीशी – माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे
निलंगा/प्रतिनिधी:आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात मागील १० वर्षात निलंगा शहरात व मतदार संघात विकासाची गंगा वाहत आहे.या काळात आ.निलंगेकर यांनी शहराचे रूप पालटले आहे. त्यामुळे शहरातील जनता या निवडणुकीत पुन्हा एकदा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी उभी आहे,असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या प्रचार सुरू आहे.यात दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले जात आहेत असे सांगून शिंगाडे म्हणाले की, निलंगा ही क वर्ग नगरपालिका असताना येथे आठवड्यातील सातही दिवस २४ तास पाणीपुरवठा होतो.राज्यातील ही अशी एकमेव नगरपालिका आहे. शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून भुयारी गटारी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. आ.निलंगेकर यांच्या नेतृत्वात सर्व जाती धर्मांसाठी सभागृहे व शादीखाना उपलब्ध आहे. शहरातील सामाजिक व जातीय एकोपा टिकण्यासाठी आ. निलंगेकर यांनी प्रयत्न केलेले असल्याचे ते म्हणाले.
निलंगा शहराबाबत कोणी कसलाही दावा करू शकत नाही.शहरात झालेली विकास कामे आ.निलंगेकर यांच्यामुळेच झाली आहेत.शहरातील जनतेसाठी आ.निलंगेकर यांनी पाठपुरावा करून पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली. नागरिकांच्या मूलभूत सुविधा सोडविण्यासाठी काम केले. शहरातील रस्ते,गटारी,पथदिवे, कचरा या संदर्भात नियोजनपूर्वक कामे झाली. त्यामुळे शहरात आज मूलभूत सुविधा संदर्भात समस्या नाहीत. नागरिकांना वेळेवर पाणी मिळते. कुठेही कचरा साठून राहत नाही. रस्त्यावर पथदिवे असल्याने अंधार पडत नाही.यामुळे शहरातील जनता समाधानी आहे.
शिंगाडे यांनी सांगितले की, आ.संभाजीराव पाटील निलंगेकर जनतेसाठी सदैव उपलब्ध असतात.एखाद्या कामासंदर्भात नागरिक आ.निलंगेकर यांना थेट भेटू शकतात.विशेषतः शहरातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा,त्यांना रोजगाराच्या शोधात पुण्या-मुंबईला जाण्याची गरज पडू नये याकडे आ.निलंगेकर यांचे लक्ष असते,असे ते म्हणाले.
निलंगा शहराचा विकास करताना शहराचे रूप पालटण्याचे कामही आ. निलंगेकर यांनी केल्याचे शिंगाडे म्हणाले.शहरात वृक्ष लागवड झाली तसेच अटल वॉक सारख्या अनोख्या योजना राबवून त्यांनी प्रेक्षणीय स्थळे निर्माण केली.या माध्यमातून विकसित शहर अशी निलंग्याची ओळख आता झाली आहे.यामुळे शहरातील जनता आ.संभाजीराव पाटील यांच्या पाठीशी उभी आहे.या निवडणुकीत शहरातील नागरिक महायुती आणि भाजपाचे अधिकृत उमेदवार आ.संभाजीराव पाटील यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार आहे. आ.निलंगेकर यांचा विजय निश्चित असून यावेळी ते विजयाची हॅट्रिक करणार असल्याचेही बाळासाहेब शिंगाडे म्हणाले.
