अनसरवाडा येथील बिनविरोध सरपंचाचा भाजपाकडून सत्कार
निलंगा : अनसरवाडा ता. निलंगा येथील बिनविरोध निघालेल्या सरपंच व सदस्यांचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी शनिवारी ता. १७ रोजी सत्कार केला.
तालुक्यातील जवळपास सहा ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या असून माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मतदार संघातील निवडणूका असलेल्या ग्रामस्थानी गटतट बाजूला सारून गावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायती बिनविरोध काढाव्यात असे अवाहन केले होते. याला लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक प्रतिसाद निलंगा तालुक्यात मिळाला आहे. जवळपास सहा ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. त्यामध्ये अनसरवाडा येथील बिनविरोध निवड झालेले सरपंच किशोर वसंतराव वाघमारे यांचा सत्कार भाजप प्रदेश सचिव युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नयन धनराज माने, धनराज माने, मोहन माने, मारुती शिंदे, संजीव माने, विलास पाटील, संभाजी विलास पाटील माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, संतोष अट्टल, उपस्थित होते.