शिरूर अनंतपाळ तालुक्यात काँग्रेस प्रचाराचा झंझावात..
काँग्रेसला ग्रामीण भागात मिळतोय प्रचंड प्रतिसाद
शिरूर अनंतपाळ : महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंके यांच्या प्रचारार्थ शिरुर अनंतपाळ तालुक्यात प्रचार रॅलीचा झंझावात शनिवारी दिसुन आला. ठिकठिकाणी काँग्रेस पक्षाला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.जागोजागी उमेदवारांचे जंगी स्वागत व औक्षण करण्यात येत होते.
तालुक्यातील अनेक गावांत शनिवारी सकाळपासून रॅली ,मतदाराच्या गाठीभेटी घेत नागरिकांचे आशिर्वाद घेतले.गावागावात नागरिकांतून न झालेली कामे , मुलभूत सुविधेपासुन आपण वंचित आहोत , विकास कामे झाले नसल्याचा पाढा नागरिक वाचत होते.भविष्यातील विकास कामांचा बॅकलॉग आपण भरुन काढणार यासाठी आपण काँग्रेस पक्षाला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
उमेदवार अभय साळुंके सोबत तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर , रामभाऊ गायकवाड,भागवत वंगे ,संजय बिरादार सह प्रत्येक गावातील सरपंच , चेअरमन, महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी प्रचार रॅलीत सहभागी होते.शनिवारी शिवपुर , थेरगाव, सावरगाव,हिप्पळगाव , गणेशवाडी,कांबळगा ,आली ,रापका ,जोगाळा ,लक्कड जवळगा ,धामणगाव सह अनेक गावांत प्रचाराचा झंझावात दिसुन आला…
तरुणांची सेल्फी साठी गर्दी…..

रॅली दरम्यान गावागावात तरुणांनी हे लातुर हाय पिल्लु sss या डायलाॅग ची क्रेझ ग्रामीण भागात चांगलीच गाजली.या डायलॉग चे निर्माते व सद्यस्थितीचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंके यांच्यासोबत सेल्फी व फोटो घेण्याचा मोह अनेकांना होतो.सेल्फीनंतर दादा आम्ही निवडणुकीत तुमच्यासोबत असल्याचे सांगताना निवडणुकीचे वातावरण चांगले असल्याचा प्रतीसादही देतात.