• Tue. Apr 29th, 2025

लातूरकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध- डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर

Byjantaadmin

Nov 11, 2024

लातूरकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध- डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर

प्रभाग १ मध्ये पदयात्रेला भरघोस प्रतिसाद फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत

जेष्ठांकडून घेतले आशीर्वाद

लातूर/प्रतिनिधी:विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने लातूर शहर मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधताना त्यांच्याकडून विकास कामाबाबत अनेक अपेक्षा व्यक्त होत आहेत. शहर व प्रभागातील मूलभूत समस्यांचे निराकारण करण्यासाठी,मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून भरघोस निधी आणून लातूरकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे डॉ.

अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्ष,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,रिपाई (आठवले गट) व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चना पाटील चाकूरकर यांनी निवडणूक प्रचारार्थ प्रभाग १ मध्ये पदयात्रा काढून मतदारसोबत संवाद साधला.यावेळी त्या बोलत होत्या.
या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले.फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.महिलांनी औक्षण केले तर ताईंना जेष्ठांनी विजयासाठी आशीर्वाद दिले.
प्रभाग १ मधील खडक हनुमान येथे श्री हनुमानाचे दर्शन घेऊन पदयात्रा सुरु झाली. प्रभागातील विविध नगरांमध्ये मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत यात्रेत सहभाग घेतला.घोषणा, आतिषबाजी करत नागरिकांनी यात्रेचे स्वागत केले.
नागरिकांसोबत संवाद साधताना उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी सांगितले की,केंद्र सरकारच्या विविध लोक कल्याणकरी योजनांच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अविरत काम होत आहे.मागील काळात राज्य सरकारने महिला,युवक, शेतकरी,कष्टकरी यांच्यासह सर्व स्तरातील व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून विविध योजना राबवल्या. सर्व योजनांचा लाभ सर्वसमावेशक पद्धतीने नागरिकांना देण्यात आला. त्यामुळे या निवडणुकीत सर्व जनता भाजपा,महायुतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने येणार आहे.लातूर शहर मतदार संघातून मला सर्वाधिक मताधिक्याने विजयी करण्याचे जनतेने ठरवले आहे.लोकांच्या अपेक्षापूर्तीसाठी मी सदैव तत्पर राहणार असल्याचा शब्द डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी यावेळी दिला.
या पदयात्रेत भाजपा शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर,शैलेश गोजमगुंडे, राष्ट्रवादीचे ॲड.व्यंकट बेद्रे, प्रशांत पाटील,माजी नगरसेवक ॲड.दीपक मठपती,संगीत रंदाळे,माजी नगरसेविका रागिनीताई यादव,अमित जोशी, ॲड.सुहास बेद्रे,मनोज सूर्यवंशी, लालासाहेब देशमुख,शिवसेनेचे दिनेश बोरा,मधुसूदन पारीख, विकासअप्पा क्षिरसागर, उपाध्यक्ष महेशप्पा सेलुकर, आबा चौगुले,पप्पू धोत्रे,जगन्नाथ पाटील,बलराज खंडूमलके, राहुल वावरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed