काँग्रेसच्या झंजावाताने मतदारसंघ ढवळला माजी मंत्री दिलीपराव देशमुख व आ.धीरज देशमुख यांच्या दौऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
जनतेच्या मनातील भावनांना फुटली वाचा
रेणापूर/प्रतिनिधी: गेल्या कांही दिवसात माजीमंत्री दिलीपराव देशमुख व आ.धीरज देशमुख यांच्या झंजावाती प्रचार दौऱ्यांनी संपूर्ण लातूर ग्रामीण मतदारसंघ ढवळून निघाला आहे.गावोगाव होणाऱ्या बैठका आणि मेळाव्यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जनतेच्या मनातील प्रश्नांना वाचा फोडत या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा शब्द मिळाल्यामुळे जनता आहे खंबीरपणे काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
काँग्रेसच्या विचाराला मानणारा हा संपूर्ण परिसर कायमच पक्षाच्या पाठीशी राहिलेला आहे.कोणी कितीही, काहीही सांगितले तरी जनतेच्या मनात काँग्रेसचा विचार पक्का आहे.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती सरकारने फसव्या घोषणा केल्या.त्यामुळे जनमत आपल्या बाजूने होईल अशी सरकारला अपेक्षा होती. परंतु मूलभूत प्रश्नांना बगल देत सरकारने केवळ आश्वासने दिली. ही आश्वासने पोकळ असल्याचे जनतेला कळून चुकले आहे.त्यामुळे जनता महायुतीला कंटाळली आहे.लातूर ग्रामीण मतदारसंघात मागील काळात आ.धीरज देशमुख यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत.मतदारसंघातील नागरिकांच्या हिताची कामे झाली आहेत.शेतकरी,शेतमजूर व सामान्य जनतेसाठी काम ही कॉंग्रेसची परंपरा आहे.त्याच परंपरेनुसार आ.देशमुख काम करत आले आहेत.यामुळे त्यांना वाढता पाठिंबा दिसुन येत आहे.
माजीमंत्री आ.दिलीपराव देशमुख यांनी ही निवडणूक स्वत:च्या हातात घेतल्याचे मागील कांही दिवसात दिसत आहे.आ.धीरज देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत ते मतदारसंघात प्रवास करत आहेत.गावोगाव त्यांचे मेळावे आणि बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
स्वातंत्र्यापासून आजवर कॉंग्रेस पक्षाने केलेली विकासकामे कुणाला सांगण्याची आवश्यकता नाही.आजवर झालेली कामे डोळ्यासमोर आहेत.त्याचा जो लाभ सामान्य जनतेला मिळाला तो जगजाहीर आहे.म्हणुनच दिलीपराव देशमुख व आ.धीरज देशमुख आपल्या गावात,परिसरात येताच नागरिक त्यांना भेटण्यास गर्दी करत आहेत.रेणापूर तालुका,लातूर तालुका अर्थात मांजरा पट्टा आणि भादा सर्कलमध्येही वातावरण कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीला पोषक आहे.आ.देशमुख यांच्या प्रचाराच्या जवळपास २ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.आता केवळ भेटीगाठी घेत मतदारांना आठवण करून देण्याची गरज आहे.आज दिसणारे चित्र पाहता दि.२० पर्यंत माहौल अजून अनुकूल होणार आहे.यावेळी मागच्या पेक्षाही अधिक मताधिक्य मिळेल,अशी चर्चा ग्रामीण भागातून ऐकायला मिळत आहे.
